Home /News /maharashtra /

Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? छोट्या घरात राहणाऱ्यांना पडले आहेत अनेक प्रश्न

Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? छोट्या घरात राहणाऱ्यांना पडले आहेत अनेक प्रश्न

Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? विशेषतः छोटी घर असणाऱ्या काही लोकांनी News18lokmat ला या शंका विचारल्या आहेत.

    मुंबई, 25 मार्च : कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. पुढचे 21 दिवस भारतासाठी महत्त्वाचे आहेत. देशभर लॉकडाऊ करण्यात आला आहे. या दिवसात व्हायरसचा प्रसार टाळायलाच हवा. स्वतःला या व्हायरसपासून कसं वाचवायचं? Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? विशेषतः छोटी घर असणाऱ्या काही लोकांनी News18lokmat ला या शंका विचारल्या आहेत. याचं साधं सोपं उत्तर जागतिक आरोग्य संघटना आणि आपलं सरकारसुद्धा देत आहे - Social Distancing, Home Quarantine. दुसरा उपाय म्हणजे हात वारंवार साबणाने धुणे- तेही किमान 20 सेकंद धुवत राहाणे. घरात राहणं, कुठल्याही घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक सोहळ्यात सहभागी न होणं. नातेवाईकांकडे न जाणं आणि कुणाला घरी न बोलवणं हेसुद्धा यामध्ये अपेक्षित आहे. Home Quarantine म्हणजे काय? आपल्या घरात तुम्ही सर्वाधिक सुरक्षित आहात. त्यामुळे बाहेर जाणं टाळा. केवळ अत्यावश्यक गोष्टी म्हणजे दूध, भाजीपाला, औषधं असं सामान आणायला बाहेर पडायची वेळ आलीच, तर घरातल्या एकाच व्यक्तीने बाहेर पडावं. सावधान! तुमच्या आजूबाजूला असू शकतो कोरोना रुग्ण, लक्षणं न दिसताच पसरवतोय व्हायरस घराबाहेर गप्पा मारायला, चावडीवर चर्चा करायला किंवा करमत नाही म्हणून कट्ट्यावर जायलाही बंदच आहे. घरातल्या घरातच किमान पुढचे काही दिवस विरंगुळा शोधावा लागेल. 10 वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिक यांनी शक्यतो घराबाहेर न पडलेलंच बरं. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरसचा हल्ला सर्वप्रथम त्यांच्यावर व्हायची शक्यता जास्त असते. Social Distancing म्हणजे काय? कुठल्याही व्यक्तीपासून किमान 3 ते 6 फूट अंतर ठेवूनच बोलावं. किराणा, दूध वगैरे आणतानाही एवढं अंतर ठेवूनच वावरावं. शिंकताना, खोकताना नाकावर, तोंडावर रुमाल धरावा. कुणाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्यांनी नाकावर मास्क बांधून राहावं. घरातसुद्धा कुणी सर्दी, ताप, खोकल्याने आजारी असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्याव. डॉक्टरशी न बोलता कुठलीही औषधं घेऊ नयेत. अशा आजारी व्यक्तीच्या जवळ कुणी जाऊ नये. मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दूर ठेवावं. बाहेर जावं लागतं त्या घरात काय? ज्यांची घरं लहान आहेत, एकाच खोलीत राहतात त्यांच्या घरात कुणी बाहेर जावं लागतं अशी व्यक्ती असेल, तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी. घरात शिरल्या शिरल्या प्रथम कोपरापासून हात साबणाने किमान 20 ते 30 सेकंद धुतल्याशिवाय घरात कुठल्याही गोष्टीला स्पर्श करू नये. बाहेरून आलेल्या व्यक्तीने बाहेरचे कपडेही स्वच्छ धुवूनच इतरांबरोबर मिसळावं. लक्षणं दिसली तर? कुणाला खोकला, ताप अशी लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा व्यक्तीने शक्यतो इतरांपासून जितकं लांब राहता येईल तितकं राहावं. त्या व्यक्तीने बाहेर जाणं पूर्णपणे टाळावं. अशा लक्षणं दिसलेल्या व्यक्तीने मास्क लावूनच घरातही वावरावं. त्या घरातल्या व्यक्तीचे कपडे, जेवण-खाण्याची भांडी, अंथरुण वेगळंच ठेवलं पाहिजे आणि इतरांबरोबर कपडेही धुणं टाळलं पाहिजे. अन्य बातम्या 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी एक नंबर! तब्बल 1 लाख लोकांनी कोरोनावर केली मात, निरोगी होऊन परतले घरी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या