क्या बात है! 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी

क्या बात है! 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी

प्रत्येक क्षणाला कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

  • Share this:

सिअ‍ॅटल, 25 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. प्रत्येक क्षणाला कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेत एका 90 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. वृद्धांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे याआधीही निर्दशनास आले होते. या आजींनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता त्या बऱ्या झाल्या आहेत, एवढेच नाही तर व्हिलचेअरवर बसून त्या घरी देखील परतल्या. जिनिव्हा वुड असे या आजींचे नाव आहे.

जिनिव्हा यांना फेब्रुवारीमध्ये कोरोनाची लागण झाली होती. सिअ‍ॅटलमध्ये याआधी रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रातील सुविधेच्या कमतरतेमुळे याआधी 23 जणांचा मृत्यू झाला. मात्रा जिनिव्हा यांनी हार न मानता कोरोनाविरुद्ध लढा दिला.

वाचा-Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच? हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य

वाचा-भूकंपानं रूस हादरलं, 7.5 रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट जारी

मंगळवारी जिनिव्हा यांची नात कॅटने सोशल मीडियावर आजीचे व्हिलचेअरवरून घरी परतल्याचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर कॅटने, "आजचा तो दिवस. माझी आजी अखेर घरी येणार. तिला मदत करणाऱ्या, तिच्यावर उपचार करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार", असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-...तर मेपर्यंत भारतात 13 लाख लोकांना होणार कोरोना, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

वाचा-लॉकडाऊन दरम्यान सरकारचं काम कसं सुरू राहणार? हा आहे मोदींचा प्लान 'बी'

जिनिव्हा बऱ्या झाल्यामुळे अमेरिकेतील हजारो रुग्णांना आशा मिळाली आहे. जिनिव्हा यांनी कोरोनाला मात दिल्यानंतर लोकांनी त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर 65 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना मूलभूत वैद्यकीय सुविधा मिळाल्यास तेही बरे होऊ शकतात असा विश्वासही लोकांना मिळाला आहे.

First published: March 25, 2020, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading