नवी दिल्ली, 25 मार्च : महाभयंकर कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. मात्र असे असले तरी जगभरात जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी त्याचा मृत्यू दर कमी आहे. चीनमधून हा विषाणू पसरण्यास सुरुवात झाली खरी, मात्र आता चीनने रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत चीनमध्ये सर्वात जास्त म्हणजे 73 हजार 650 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये 3 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या आकड्यात चीनला इटलीने मागे टाकले आहे. वाचा- कोरोनामुळे अमेरिकेत भीषण स्थिती,डॉक्टरांसाठी या भारतीय हॉटेलचा कौतुकास्पद निर्णय इटलीमध्ये मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इटलीतील मृतांचा आकडा 6 हजारावर पोहचला आहे. तर 8 हजार 326 लोकं निरोगी झाले आहे. तर इराण यात तिसऱ्या क्रमांकवर आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवांसापासून मृतांची संख्या कमी झाली आहे. इराणमध्ये 8 हजार 376 लोकं निरोगी झाले आहेत. वाचा- …तर घरात बसून हजारो लोकं आत्महत्या करतील, ट्रम्प यांचे अजब वक्तव्य भारतात 40 जण झाले बरे भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात 562 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यातील 40 लोकं निरोगीही झाले आहेत. भारतात आजपासून लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळं हळुहळु ही परिस्थिची आटोक्यात येण्याची शक्यता आहे. भारताची लोकसंख्या पाहता मृतांचा आकडा आणि संसर्गाचा आकडा कमी आहे. भारताच्या उपाय योजनांचे आणि निर्णयाचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. वाचा- 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी लॉक डाऊनचा सर्व देशांना झाला फायदा लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जातात. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर सर्वात आधी चीनमध्ये सर्वात आधी लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. लॉक डाऊनमुळे चीनमधील मृतांचा दर झपाट्याने वाढला. त्यानंतर इटली, स्पेन, इराण यांसारख्या देशांमध्येही लॉक डाऊन घोषिक करण्यात आला. आता भारतातही 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.