Home /News /lifestyle /

सावधान ! तुमच्या आजूबाजूला असू शकतो कोरोनाचा रुग्ण, लक्षणं न दिसताच पसरवतोय व्हायरस

सावधान ! तुमच्या आजूबाजूला असू शकतो कोरोनाचा रुग्ण, लक्षणं न दिसताच पसरवतोय व्हायरस

कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) एक तृतीयांशपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत.

    बीजिंग, 25 मार्च : कुणी शिंकला, खोकला, कुणाला ताप आला की आता आपल्याला भीतीच वाटतं. कारण ही सर्वसामान्य असणारी लक्षणं महाभयंकर कोरोनाव्हायरसची (coronavirus) सुरुवातीची लक्षण आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणं नसली तरीदेखील ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असू शकते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने (South China Morning Post) काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ज्यानुसार Covid-19 संक्रमित एक तृतीयांश लोकं अशी आहेत, ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत किंवा अगदी कमी लक्षणं असतात. याला asymptomatic लक्षण असं म्हटलं जातं. हे वाचा - पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी? जाणून घ्या कोरोनाव्हारसचं इनक्युबेशन पीरियड 1 ते 14 दिवसांचा आहे. या दिवसांमध्ये व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याची लक्षणं दिसून येतात. मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये हा पीरियड वेगवेगळा असल्याचं समोर आलं आहे. मात्र लक्षणं न दिसणं हेदेखील कोरोनाव्हायरसचं एक वैशिष्ट्य आहे आणि ज्याच्यामुळे हा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे असं मानलं जातं. चीनच्या हुबेई प्रांतात आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे 81 हजारपेक्षा जास्त प्रकरणं आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत यापैकी जवळपास 43 हजार रुग्ण असे आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली नाही. इटलीदेखील 44 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली नाहीत, ज्यामुळे व्हायरस पसरला असं म्हटलं जातं. हे वाचा - इटलीमध्ये कोरोनामुळे 743 जणांच्या मृत्यूचा रेकॉर्ड, जगातील 2.6 अब्ज लोक लॉकडाऊन अशी लक्षणं असल्यानंतर कोरोनाव्हायरस किती झपाट्याने पसरतो, याबाबत शास्त्रज्ञांना ठोस काही समजलेलं नाही. त्यामुळे लक्षण नसलेली कोरोनाग्रस्त व्यक्ती किती लोकांपर्यंत हे संक्रमण पसरवू शकते हे समजू शकलं नाही. European Union च्या स्थानीय मीडिया रिपोर्टनुसार खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं मानलं आहे की, चीनमध्ये कोरोनाव्हायरसची 1 ते 3 टक्के प्रकरणांसाठी असेच रुग्ण जबाबदार आहेत. लक्षणं न दिसता कोरोनाव्हायरस पसरवणाऱ्या रुग्णांबाबत आणखी एक उदाहरण म्हणजे जपानमधील Diamond Princess क्रुझ आहे. हे जहाज कित्येक आठवडे क्वारंटाइन करण्यात आलं कारण यातील 712 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते, ज्यापैकी 334 रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणं नव्हती. जपानच्या शास्त्रज्ञांनी याबाबत अभ्यास केला. या अभ्यासानुसार अशी भरपूर प्रकरणं आहेत, ज्यामध्ये आजारी रुग्णांची चाचणी होत नाही आणि त्यांच्यामार्फत आजार पसरत आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँगच्या संयुक्त अभ्यासातून भयानक अशी माहिती समोर आली आहे. 23 जानेवारीला वुहान शहर बंद होण्यापूर्वीच अशा लोकांमुळे आजार पसरला ज्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणं नव्हती. त्यामुळेच जवळपास 79 टक्के लोकं या व्हायरसच्या विळख्यात आले. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगमधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ बेन्जामिन काऊलिंग सांगतात, लक्षणं न दिसताही लोकं कोरोनाग्रस्त असू शकता आणि हेच लोक इतर निरोगी लोकांपर्यंत व्हायरस पोहोचवतात. जागतिक आरोग्य संघटनेनंही अशा लोकांना एका श्रेणीत ठेवलं आहे. दक्षिण कोरियानेदेखील हाच नियम आपल्या देशात लागू केला आहे. मात्र चीनमध्ये ज्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आली,  त्यांनाच रुग्ण मानण्यात आलं. यूएस, ब्रिटन आणि इटलीमध्ये तर लक्षणं न दिसणाऱ्यांच्या टेस्टच झाल्या नाहीत आणि याच ठिकाणी सर्वात जास्त प्रकरणं वाढत आहेत. हे वाचा - Corona समोर ढाल बनून उभी महिला डॉक्टर, संपूर्ण देशाचं व्हायरसपासून केलं रक्षण दक्षिण कोरियामध्ये 20 टक्के कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये लक्षणं दिसली नाहीत. सरकारने त्यांना रुग्णालयात ठेवून त्यांच्यावर उपचार केले, त्यांच्या कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सोडण्यात आलं. कोरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या संचालक Jeong Eun-kyeong यांनी सांगितलं की, कोरियामध्ये लक्षणं नसलेले कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण इतर देशांमधील आहेत, इथं सर्वांचीच चाचणी केली जाते आहे आणि त्यामुळे दक्षिण कोरियात कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळालं आहे. आतापर्यंत जगभरात या व्हायरसने 4 लाख 20 हजार लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे, तर 19 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या