जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये किती मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल? कोण सर्वात श्रीमंत?

शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये किती मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल? कोण सर्वात श्रीमंत?

शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये किती मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल? कोण सर्वात श्रीमंत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 18 सदस्यीय मिनी कॅबिनेट विस्तारानंतर अनेक सत्य समोर आलं आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 18 सदस्यीय मिनी कॅबिनेट विस्तारानंतर अनेक सत्य समोर आलं आहेत. ज्यात कोटींची संपत्ती असलेल्या 20 मंत्र्यांपैकी 75 टक्क्यांविरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सद्वारे केलेल्या एका अभ्यासानुसार, एकूण 15 मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी प्रकरणाचा उल्लेख आहे. ज्यात शिंदे गटातील शिवसेनेचे सात आणि भाजपच्या 8 मंत्र्यांचा समावेश आहे. शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत मंत्री… 20 कोट्यवशींपैकी भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे 441.65 कोटींची संपत्ती आणि 283.36 कोटींच्या दायित्वासह मंत्र्यांमध्ये सर्वात श्रीमंत आहेत. सर्वात गरीब मंत्र्यांमध्ये संदीपान भुमरे आहेत. त्यांच्याजवळ 2.92 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ADR द्वारे ज्या मंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे, त्यांची सरासरी मालमत्ता 47 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये भाजपची 58 कोटी रुपये आणि शिंदे गटाची सरासरी 36 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. महाराष्ट्रातलं सत्तांतर, राऊतांच्या अटकेवर मौन, राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच मातोश्रीवर!

 किती झालंय शिक्षण… शैक्षणिक बाबतीत सांगायचं झालं तर दोन मंत्री किंवा 10 टक्के SSC उत्तीर्ण आहे. 6 (30 टक्के) उच्च माध्यमिक. 11 मंत्री (55 टक्के) पदवीधर आणि भाजपचे मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. श्रीलंकेतील विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात