अकोला, 03 ऑगस्ट : अकोला (akola) जिल्ह्यात खळबळ माजवून देणारा अकोट शहरातील दरोड्याचा (robbed ) शोध लावणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अकोट (akot) शहराचा कारभार हातात घेतलेल्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना दरोडेखोरांनी चांगलीच सलामी देऊन स्वागत केले होते. पण अखेर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या दरोड्याचा तीन दिवसातच तपास लावला असून 6 आरोपींना अटक केली.
मंगळवारी 31 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अकोट शहरातील गजबजलेल्या जवाहर रोड लगत बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरी कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत दरोडा टाकला होता. याच परिवारातील नातीच्या प्रसंगावधनामुळे घरातील वृद्ध दाम्पत्याचा जीव वाचला. सदर घटनेचा अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पण त्यात देखील हे आरोपी तोंडाला बांधून असल्याने तपास नेमका करावा तरी कसा हाच प्रश्न ठाणेदार प्रकाश अहिरे यांना पडला. पण आपला अभ्यास व पोलीस खात्याचा दांडगा अनुभव आधार घेत अकोट पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली.
'स्पा'च्या नावाखाली देह विक्रय व्यापार; 16 सेंटरवर पोलिसांचं धाडसत्र
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वैशाली विठ्ठल ठाकरे ही आरोपी महिला अमृतलाल सेजपाल यांच्या घरी घरकामाला होती. त्यामुळे तिला सेजपाल यांच्या घराची माहिती असल्याने तिने दरोड्याचा डाव रचला व सोबतीला आपला पती विठ्ठल नामदेवराव ठाकरे, संगम गणेशराव ठाकरे, सागर गणेशराव ठाकरे, अमृता संगम ठाकरे, मुक्ताई संकुल कबुतरी मैदान अकोट व सीमा विश्य निंबोकर राहणार नर्सिंग कॉलनी अकोट या सहा जणांसोबत घेऊन दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला.
पण तिजोरी न सापडल्याने व अमृतलाल सेजपाल यांच्या नातीने आरडाओरडा केल्याने डाव फसला. संपूर्ण घटना क्रम पाहता पोलिसांनी फक्त चेहरा झाकलेल्या आरोपींच्या सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी शिताफीने या आरोपींना अटक केली.
पठ्ठ्याने कमालच केली! हँडल नव्हे तर चक्क सीट पकडून चालवली बाईक; पाहा VIDEO
सदरच्या कारवाईमुळे अकोट शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, रत्नदीप पळसपगार, गणेश पाचपोर, चंद्रकांत ठोंबरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणजीत खेडकर, पो.हवालदार विलास मिसाळ, उमेश सोळंके, नापोकॉ उमेश पराये, राजेश वसे, सुलतान पठाण, गोपाल अघडते, गोपाल बुंदे, विजयसिंग चव्हाण, विजय सोळंके, पो.कॉ. दिलीप वाठोरे, दिलीप तायडे, वसिम शेख,संजय डोंगरदिवे, विशाल दांदळे, विठ्ठल चव्हाण, जवरीलाल जाधव, उदयप्रसाद शुक्ला, अंकुश डोंबाळे, संतोष कोकाटे, म.पो.कॉ. सुनिता डाहे, उमा बुटे, अकोट शहर पोलीस तसेच सायबर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पो.कॉ. गणेश सोनोने, गोपाल ठोंबरे यांनी अहोरात्र परिश्रम घेवून गुन्ह्याचा 72 तासांचे आत छडा लावून गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्ह्यांमध्ये 5 पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्याने कलम 394, 452, 506, 34 व गुन्ह्यात वाढीव कलम 395 भादंविचे समाविष्ट करण्यात आले असून गुन्ह्यातील आरोपी यांचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन अकोट शहर
पोलीस स्टेशन गुन्ह्याचा तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.