मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'स्पा'च्या नावाखाली देह विक्रय व्यापार; 16 सेंटरवर धाड, आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरूण-तरुणी

'स्पा'च्या नावाखाली देह विक्रय व्यापार; 16 सेंटरवर धाड, आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरूण-तरुणी

अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

दुर्ग, 3 सप्टेंबर : देशभरात सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये अनेक ठिकाणी देह विक्रय व्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अशा स्पा सेंटरविरोधात कारवाई करीत आहे. यादरम्यान छत्तीसगड पोलिसांनी 17 स्पा सेंटर्सवर कारवाई केली आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांनी तरुणींना संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी सायंकाळी दुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Prostitution under the name of spa Raid on 16 centers youths found in offensive condition)

या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या टीमने सुर्या नावाच्या एका मॉलमधील 6 स्पा सेंटर्समध्ये कारवाई केली. यादरम्यान अनेक तरुण तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केली. पोलिसांनी जेव्हा या मॉलच्या वरच्या माळ्यावरील स्पा सेंटर्सवर धाड टाकली तेव्हा येथे स्पाच्या नावाखाली चुकीचं काम सुरू असल्याचं दिसून आलं.

हे ही वाचा-विद्यार्थ्यांनी जन्माष्टमीचा उपवास ठेवला म्हणून शिक्षकाची सटकली; अशी केली शिक्षा

मात्र काही तरुणी या धाडीदरम्यान पळून गेली. त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. पोलिसांनी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही कारवाई केली. अनेक ठिकाणी तर स्पा सेंटर बाहेरुन बंद होते, मात्र आत देह विक्रय व्यापार सुरू असल्याचं दिसून आलं. पोलिसांच्या टीमने एसेन्स स्पा मॉल, सेन्स स्पा मॉल, सेन्सेशन स्पा मॉल, ओरा थाई स्पा मॉल, अवनी ट्रू स्पा मॉल, ब्लू एलासा स्पा मॉल, अंगम स्पा जुनवानी , लक्सी स्पा जुनवानी, ली स्पा जुनवानी, स्वादिका स्पा सुपेला, जारा स्पा सुपेला, हमर स्पा जुनवानी , लग्जरी स्पा जुनवानी, राजश्री स्पा नेहरू नगर, रोज स्पा होटल सूर्या, जॅस्मिन स्पा फ्लोरेट होटल, एलीट स्पा सुपेला सह 17 सेंटर्सवर कारवाई केली.

First published:

Tags: Crime news