Home /News /maharashtra /

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय फायद्यासाठी राजकारण- गृहमंत्री

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय फायद्यासाठी राजकारण- गृहमंत्री

मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांबाबतही गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण....

    मुंबई, 2 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुसांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण आता वेगळं वळण घेत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी जोरदार मागणी भाजपनं केली आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे. तसेच मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांबाबतही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हेही वाचा...'सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी करतेय 'बॉलिवूड'चा तपास' सुशांत सिंग राजपूत कथित आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. जरी बिहारमध्ये पाटणा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला तरी भादंवि कलम 12 व 13 अंतर्गत घटना जिथे घडली, त्या कार्यक्षेत्रातील पोलिस तपास करतात. त्याच न्यायकक्षेतच हा खटला चालवला जातो, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाची योग्य चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत. अतिशय बारकाईने तपास करत आहेत. तरीदेखील राजकीय फायद्यासाठी या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी होतं आहे, त्याचा मी तिव्र निषेध करतो, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. ...the offence is committed. I condemn the demand for the @itsSSR case to be handed to #CBI. The case is now being politcised for political gains. #MaharashtraPolice is inquiring into the case professionally & are competent in digging out the truth, leaving no stone unturned! गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून सांगितलं की, सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. मुंबई पोलिसांनी याआधीच या प्रकरणाशी संबंधित आरोपांची तपासणी करत आहेत. पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे बिहार पोलिस मुंबईत चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी करतेय 'बॉलिवूड'चा तपास दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांनीही त्यात आता उड्या घेतल्या आहेत. बिहारच्या अनेक मंत्र्यानंतर आता केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मुंबई पोलिसांचा तपास म्हणजे केवळ प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हेही वाचा...सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! पार्ट्यावरून भाजप नेत्यानं केलं मोठं वक्तव्य सिंह म्हणाले, मुंबई पोलीस बॉलिवूडमधल्या दिग्गजांचा तपास करत आहे. मात्र हा तपास म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा आणि नेमका काय केला जात आहे ते सुद्धा सांगितलेलं नाही. पाटना पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतरच या प्रकरणी खरा तपास सुरु झाल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी हे आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस पथकाचं नेतृत्व करणार आहेत. ते पाटण्याहून मुंबईला येणार असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Anil deshmukh, Mumbai police, Sushant singh raajpoot, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या