दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, सुशांतचे वडील केके सिंह यांनी याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. बिहार पोलीस मुंबईत चौकशी करत आहेत. ते एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीगार्डने रिया चक्रवर्तीवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने काही धक्कादायक वक्तव्य याप्रकरणाबाबत केली आहेत. सुशांतच्या बॉडीगार्डने एका खासगी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. सुशांतच्या वडिलांनी याप्रकरणी जी पावलं उचलली आहेत, तर यामध्ये काहीतरी तथ्य असणार, असं तो म्हणाला. 'सुशांत सर बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली असणाऱ्या खोलीमध्ये असायचे तेव्हा वरच्या मजल्यावरील खोलीत पार्टी सुरू असायची. या बड्या पार्टींचं आयोजन रिया मॅम करायच्या ज्यामध्ये त्यांची आई, भाऊ आणि मित्र येत असत', असा गौप्यस्फोट बॉडीगार्डनं केला आहे. बॉडीगार्डच्या मते, या पार्ट्यांमध्ये कधी सुशांतचे वडील दिसायचे नाहीत. हे सर्व उगाचच केलेले खर्च होते, ज्यामध्ये सुशांत सहभागी नाही व्हायचा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. त्याने अशी देखील माहिती दिली की रियाने सुशांतचा सर्व जुना स्टाफ बदलला होता, केवळ मीच शिल्लक राहिलो होतो जो त्यांच्याबरोबर होतो. बॉडीगार्डने अशी माहिती दिली की, 2019 मध्ये सुशांत रियाला भेटला होता. त्यानंतर दोघे युरोप ट्रीपवर देखील गेले होते. तिथून परतल्यानंतर सुशांत सारखा आजारी पडत होता. त्याआधी सुशांत खूप सक्रीय होता. जिम, स्विमिंग, डान्स हे सर्व तो करायचा. मात्र, त्यानंतर तो अधिकतर बेडवरच राहू लागला होता. हेही वाचा...सुशांतच्या EX-मॅनेजरच्या घरी पोहोचले बिहार पोलीस,अभिनेत्याआधी संपवलं होत जीवन सुशांतच्या औषधांबाबत बोलताना हा बॉडीगार्ड म्हणाला, 'औषधांबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र जेव्हा कधी मी औषधे आणण्याासाठी मेडिकलमध्ये जात असे, तेव्हा मला विचारण्यात येत असे की औषधे कुणासाठी आहेत? कुणी मागवली आहेत? या प्रश्नांवरून वाटायचे की काहीतरी भयंकर औषधे आहेत, ज्यामुळेच साहेब नेहमी झोपून असतात.' सुशांतच्या बॉडीगार्डनं दिलेल्या माहितीवरून रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होतोय...जेव्हा लॉकडाऊन मध्ये सामान्य माणूस आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ही पोहचू शकत नव्हता तेंव्हा अशा पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरु होत्या? मंत्र्यांच्या? अधिकाऱ्यांच्या? सीबीआय चौकशी झाली पाहिजे!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Sushant Singh Rajpoot, Sushant Singh Rajput