Home /News /national /

Sushant Singh Rajput: मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी करतेय 'बॉलिवूड'चा तपास, केंद्रीय मंत्र्यांचा गंभीर आरोप

Sushant Singh Rajput: मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी करतेय 'बॉलिवूड'चा तपास, केंद्रीय मंत्र्यांचा गंभीर आरोप

'मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा आणि नेमका काय केला जात आहे ते सुद्धा सांगितलेलं नाही.'

    नवी दिल्ली 2 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांनीही त्यात आता उड्या घेतल्या आहेत. बिहारच्या अनेक मंत्र्यानंतर आता केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मुंबई पोलिसांचा तपास म्हणजे केवळ प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सिंह म्हणाले, मुंबई पोलीस बॉलिवूडमधल्या दिग्गजांचा तपास करत आहे. मात्र हा तपास म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा आणि नेमका काय केला जात आहे ते सुद्धा सांगितलेलं नाही. पाटना पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतरच या प्रकरणी खरा तपास सुरु झाल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी हे आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस पथकाचं नेतृत्व करणार आहेत. ते पाटण्याहून मुंबईला येणार असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास करण्याआधी बिहार पोलीस दिशा सॅलियनच्या (Disha Salian) घरी पोहोचले आहेत. दिशा सुशांतची पूर्व-मॅनेजर आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी दिशाने देखील आत्महत्या केली होती. काही दिवसांच्या कालावधीमध्ये झालेल्या या दोन्ही घटनांमुळे बॉलिवूड हादरले होते. सुशांत 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. दरम्यान अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती. ...तर मुव्ही माफिया काय करू शकतात याची कल्पना करू शकतो- कंगना रणौत दिशा सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहायची. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच तो देखील असेच टोकाचे पाऊल उचलेल असे कुणाला वाटले नव्हते. ...आणि म्हणून मी सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते,अंकिताचं स्पष्टीकरण सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि त्याचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'सुशांत दिशाच्या मृत्यूनंतर खूप अस्वस्थ होता. दिशाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला मोठा धक्का बसला होता, त्याने लगेच टीव्ही सुरू केला. यावेळी त्याची बहिण, स्टाफ आणि मी देखील तिथेच होतो. तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तो घाबरला होता, त्याच्या बहिणीने त्याला जवळ घेतले.'
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या