गावात कोणी उपाशी राहू नये म्हणून 'हा' अवलिया अख्ख्या गावाला देत आहे मोफत किराणा

गावात कोणी उपाशी राहू नये म्हणून 'हा' अवलिया अख्ख्या गावाला देत आहे मोफत किराणा

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण राज्य संकटात सापडलं आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नसल्याने अनेकांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

शिर्डी, 28 मार्च: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण राज्य संकटात सापडलं आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नसल्याने अनेकांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कोणी उपाशी राहू नये, यासाठी संगमनेरातील उद्योजकाने मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या गावातील 650 कुटुंबाला 1000 रूपयांचा आवश्यक किराणा आणि भाजीपाला घरपोहोच दिला जात आहे. विशेष म्हणजे दर आठ दिवसाला त्यांचा हा नित्यक्रम सुरू राहणार आहे, असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...सावधान! महाराष्ट्रात वृद्धांपेक्षा तरुणांना Coronavirus बनवतोय आपला शिकार

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मांडवे गावात 650 कुटुंब आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसेही नाही. कुटुंबियांना जगवणार कसं? अशा विचारात असणाराच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कुटे धावून आले आहेत. आपल्या गावातील लोक उपाशी राहणार नाही याची काळजी ते घेत आहेत. बाबासाहेब कुटे फाऊंडेशनतर्फे गावातील 650 कुटुंबाला 1000 रूपयांचा अत्यावश्यक किराणा आणि भाजीपाला घरपोहोच दिला जात आहे.

हेहा वाचा..पापलेट, काटी, सुरमई...,मुंबईकरांनो, तब्बल 40 टन माशा लवकरच बाजारात!

गावातील शिक्षक, शेतकरी, तरूण यांनीही त्यांच्या कामाला हातभार लावला आहे. घरोघरी देण्याच्या सामानाच्या पिशव्या भरून वाटायला मदत करत आहे. कुटे फांऊडेशनच्या संचालिका प्रविणी मोरे यांच्या संकल्पनेतून हा आदर्श उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अनेक गरीब कुटुंबाच्या जेवणाचा प्रश्न ही सुटला आहे. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. अशाप्रकारे गावोगावी उपक्रम सुरू केले गेले तर गरजेच्या गोष्टीसाठी बाहेर फिरणारांची गर्दी कमी होईल आणि अन्नावाचून कोणताही गरीब मरणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा धक्कादायक VIDEO, पोलीस ही गेले चक्रावून!

First published: March 28, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या