जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पापलेट, काटी, सुरमई...,मुंबईकरांनो, तब्बल 40 टन माशा लवकरच बाजारात!

पापलेट, काटी, सुरमई...,मुंबईकरांनो, तब्बल 40 टन माशा लवकरच बाजारात!

पापलेट, काटी, सुरमई...,मुंबईकरांनो, तब्बल 40 टन माशा लवकरच बाजारात!

शासनाने वाहतुकीवर तसंच बाजारांमध्ये खुल्या विक्रीवर निर्बंध आणल्याने या माशांच्या विक्री बाबत तसेच त्यांची अन्य ठिकाणी वाहतूक करण्याकरीता प्रश्न निर्माण झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

पालघर, 28 मार्च:  सातपाटीच्या बंदरात गेल्या चार दिवसांपासून येऊन ठेपलेल्या सुमारे 40 टन माशांच्या विक्रीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, राज्य सरकारने मासे विक्रीला परवानगी दिली असून  मत्स्यव्यवसाय मंत्री आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी सहकार्य केल्याने सातपाटी येथील या माशांच्या साठ्याची निर्यात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. 12-15 दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या सुमारे 60 ते 70 बोटी 24 व 25 मार्च रोजी सातपाटी बंदरामध्ये दाखल झाल्या होत्या. मासे उतरवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना देखील हा मत्स्य साठा बंदरामधील शीतगृहांमध्ये दाखल झाला. शासनाने वाहतुकीवर तसंच बाजारांमध्ये खुल्या विक्रीवर निर्बंध आणल्याने या माशांच्या विक्री बाबत तसेच त्यांची अन्य ठिकाणी वाहतूक करण्याकरीता प्रश्न निर्माण झाली होती. हेही वाचा - ‘आधी भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं नंतर दिला बाळाला जन्म’ या माशांमध्ये काही प्रमाणात पापलेट सह काटी, सुरमई मुशी या निर्यात करण्याच्या दर्जाचे मासे होते. सध्या सातपाटी येथील मच्छीमारमार्फत मासेमारी केल्यानंतर मासे सहकारी सोसायटीमध्ये गोळा केले जातात. नंतर हे मासे पोरबंदर मार्ग निर्यात केले जातात. मात्र, राज्यातील सीमा वाहतुकीसाठी बंद केल्याने निर्यातदार आपली वाहनं सातपाटी इथं पाठवण्यास तयार नव्हते. हेही वाचा - …तर 29 एप्रिलला खरंच होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य विविध मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधीनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने गुजरात मधील तसंच राज्यातील संबंधित विभागांशी समन्वय साधून या माशांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस यांनी निर्यातीसाठी मासे नेण्याकरता आलेल्या वाहनांची वाहतूक सोयीची होईल. याकरिता सहकार्य केल्याचे येथील सर्वोदय सातपाटी फिशरमेंन सहकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मच्छीमारांसमोर आलेले संकट टळल्याने मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे आभार मानले आहेत. खलाशांना घरी सुखरूप पाठवले बाजारामध्ये माशांची विक्री करणे कठीण होत असल्याने तसंच खोल समुद्रात मासेमारीस जाण्यास खलाशी तयार नसल्याने सातपाटी बंदरातील सर्व बोटींनी तुर्तास मासेमारी स्थगित केली आहे. या आठवड्यात सातपाटी येथील बोटींमध्ये कामावर असलेल्या सुमारे एक हजार खलाशांना पोलिसांच्या मदतीने विक्रमगड, जव्हार आणि अन्य ठिकाणी सुखरूप पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात