मुंबई, 28 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत जितकं रुग्ण आढळलेत, त्यातील बहुतेक रुग्ण वयोवृद्ध आहेत. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) हे चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांना (young people) कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त तरुण आहेत. हे वाचा - लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही असू शकतो Coronavirus, काय आहे सत्य? राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 154 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तरुण आणि प्रौढ आहेत. तर वयस्कर व्यक्तींचं प्रमाण कमी आहे. या आकडेवारीनुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले फक्त 20 रुग्ण आहेत तर 21 ते 60 वयोगटातील तब्बल 115 रुग्ण आहेत. 31 ते 40 वयोगटात सर्वाधिक 38 रुग्ण आहेत. राज्याची ही आकडेवारी पाहता आता चिंता अधिकच वाढली आहे.
महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. 1 ते 10 वयोगटातील एकूण 3 रुग्ण आहेत. मुंबईत 3 वर्षांची मुलगी आणि नवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत. हे वाचा - भारतीय रेल्वेनंही सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड, पाहा एक्स्प्रेसमधील INSIDE PHOTO देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 तरुणांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या आणि बिहारमध्ये 38 वर्षांच्या तरुणाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.