• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  •  मस्करीत 'ये लंबू' म्हटलं अन् मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यात केली मित्राची हत्या

 मस्करीत 'ये लंबू' म्हटलं अन् मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यात केली मित्राची हत्या

ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला

ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला

ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला

  • Share this:
भिवंडी, 10 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वीच मित्राच्या नात्याचा फ्रेंडशीप डे (Friendship Day) साजरा झाला. मित्राच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी एकमेकांना शुभेच्य़ा दिल्या. मित्रांमध्ये थट्टा, मस्करी ही नवी बाब नाही. पण मित्रांमध्ये मस्करी सुरू असतानाच 'ये लंबू' म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना भिवंडीमध्ये (bhiwandi) समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यातच मित्राची  हत्या केली. ही घटना भिवंडी शहरातील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.  समीर शेख (वय, २१ रा, आजाद नगर, भिवंडी ) या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर मोहंमद अजगर शेख उर्फ सन्नाटा (वय २०, नुरीनगर, भिवंडी ) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. तातडीने मायदेशी परत या, अफगाणिस्तानातील भारतीयांना मोदी सरकारच्या सूचना मृत मोहंमद अजगर हा कुटुंबासह भिवंडीतील नुरी नगर परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी मृतक व आरोपी समीरमध्ये काही कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास मृतक मोहंमद अजगर याने आरोपी समीरला 'ये लंबू' म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापटी झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भर रस्त्यातच मृतक मोहंमद अजगरला मारहाण करीत त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी तरुणी; धडकी भरवणारा VIDEO ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य पाहता परिससरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी नितीन पाटील करीत आहेत. मात्र आशा प्रकारे शुल्लक वादातून घटना घडत असताना ना पालकांचे ना पोलिसांचा धाक राहिला नसल्याने सद्या तरुणांमध्ये जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.
Published by:sachin Salve
First published: