Home /News /viral /

जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी राहिली तरुणी; धडकी भरवणारा VIDEO

जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी राहिली तरुणी; धडकी भरवणारा VIDEO

बुर्ज खलिफाच्या 828 मीटर उंचीवर ही तरुणी फक्त 1.2 मीटर जागेवर उभी होती.

    दुबई, 10 ऑगस्ट : जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर (Burj khalifa) जाणं अनेकांचं स्वप्नं असतं. बुर्ज खलिफावर जाऊन उंचावरून दिसणारं सौंदर्य पाहण्याचं मजा काही औरच. काही उंचावर गेल्यावर तिथूनच खाली वाकून पाहिलं तरी धडकी भरते. मग विचार करा. बुर्ज खलिफाच्या टोकावर जाऊन खाली पाहिलं तर काय होईल? बुर्ज खलिफाच्या उंच टोकावर उभ्या असलेल्या अशाच एका तरुणीचा (Woman on Burj khalifa top) व्हिडीओ (Video viral) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. बुर्ज खलिफाच्या टॉपवर एक तरुणी उभी आहे. त्या तरुणीच्या हातात एक बोर्ड आहे. ही तरुणी जाहिरात करताना दिसते आहे. यूएईतील एअरलाइन्स कंपनी अमीरात एअरलाइन्सची (Emirates airline) ही जाहिरात आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच चर्चत आहे.
    व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला बोर्डवर वेगवेगळे मेसेज होतात. त्यानंतर कॅमेरा झूम आऊट होतो आणि जगातील सर्वात उंच इमारत ब्रुर्ज खलिफावर एक तरुणी उभी दिसते. ही तरुणी अमीरात फ्लाइटची अटेंडंट (Flight Attendant on Burj Khalifa) आहे. 30 सेकंदाची ही जाहिरात आहे. हे वाचा - अरारारा...! 300 फूट उंचीवर बेड ठेऊन हे चक्क निवांत झोपलेत, काळजाचा ठोका चुकवणारे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात स्पेशल इफेक्ट आणि ग्रीन स्क्रिनचा वापर केला असावा असा अंदाज लावण्यात आला. पण हा सीन स्पेशल इफेक्टशिवायच शूट करण्यात आला आहे. याची शूटिंग कशी झाली त्याचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. जगातील ही सर्वात उंच इमारत. 828 मीटर इतकी त्याची उंची आहे. एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार 828 मीटर उंच इमारतीच्या उंचीवर उभं राहण्यासाठी फक्त 1.2 मीटर जागा होती. हे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या