जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / तातडीने मायदेशी परत या, अफगाणिस्तानातील भारतीयांना मोदी सरकारच्या सूचना

तातडीने मायदेशी परत या, अफगाणिस्तानातील भारतीयांना मोदी सरकारच्या सूचना

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) असणाऱ्या भारतीय नागरिकांनी (Indian citizens) तातडीने भारतात परत यावे, अशी सूचना भारत सरकारच्या (Government of India) वतीनं करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) असणाऱ्या भारतीय नागरिकांनी (Indian citizens) तातडीने भारतात परत यावे, अशी सूचना भारत सरकारच्या (Government of India) वतीनं करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील वाढता हिंसाचार (growing violence) आणि राजकीय अस्थिरतेच्या (Political instability) पार्श्वभूमीवर सरकारने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना मायदेशी परत येण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी परतीच्या प्रवासाची मिळेल ती सोय करावी आणि सुरक्षित भारतात यावं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. हिंसाचार वाढला अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढल्यामुळे अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागातील हिंसाचार वाढतच चालल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचं चित्र आहे. अफगाणिस्तानातून भारतात जाणारी विमानं जोपर्यंत सुरू आहेत, तोपर्यंत मिळेल त्या विमानानं नागरिकांनी भारतात जावं, असं आवाहन अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासानं केलं आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांनी आपली नावं भारत सरकारच्या अफगाणी दूतावासाच्या वेबसाईटवर नोंदवावीत, अशी सूचनाही करण्यात आली आहे. विशेषतः अफगाणिस्तानातील मझर-ए-शरीफ हे शहर ताब्यात घेण्यासाठी तालिबानकडून हल्ल्याची योजना आखली जात असल्यामुळे तिथल्या नागरिकांना तातडीनं भारतात परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मझर-ए-शरीफहून दिल्लीला जाण्यासाठी एका खास विमानाची भारतातर्फे सोय करण्यात आली असून मंगळवारी रात्री हे विमान रवाना होणार आहे. हे वाचा - भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात अफगाणिस्तानात अशांतता अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबाननं एकेक प्रदेश काबीज करायला सुरुवात केली आहे. अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात जोरदार चकमकी झडत असून हिंसाचार वाढला आहे. अफगाणी सरकारच्या ताब्यात असणारा एकेक भूभाग जिंकून घेण्यासाठी तालिबान आक्रमक झाला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांच्या परतीसाठी भारताकडून सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात