मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरातून 10 तोळं सोनं घेऊन पळाले, पण महिलेनं हिंमत सोडली नाही, एकाला बाईकवरून खेचले खाली आणि...

घरातून 10 तोळं सोनं घेऊन पळाले, पण महिलेनं हिंमत सोडली नाही, एकाला बाईकवरून खेचले खाली आणि...

शैलजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळं सोनं घेऊन तो आधीच पसार झाला होता.

शैलजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळं सोनं घेऊन तो आधीच पसार झाला होता.

शैलजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळं सोनं घेऊन तो आधीच पसार झाला होता.

कल्याण,  13 ऑगस्ट : एका महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे 3 सराईत चोरट्यांना (thief) पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सदर महिला घरी पोहचली असता एक अज्ञात इसम तिला घरातून बाहेर पडताना दिसला तो चोर असल्याचा संशय आल्याने महिलेने आरडाओरडा करत त्याचा पाठलाग केला. तेव्हा नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याच दरम्यान त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरला. या चोरट्याकडून तब्बल 10 सोनं जप्त करण्यात आलं आहे.

कल्याण पश्चिमेतील (kalyan west) भारताचार्य चौकात राहणाऱ्या शैलेजा करदकर या 5 जुलै रोजी जेवण्याच्या सुट्टीत दुपारच्या सुमारास भावाच्या घरी आल्या. जेवण आटोपून शैलजा तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भावाच्या घरून त्याच इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या आपल्या घरी येत होत्या. तेव्हा तिने आपल्या घराचे दार उघड असून एक व्यक्ती बाहेर पडत असल्याचे पाहिले हे पाहून शैलजाने आरडाओरडा सुरू केला. तिने त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. तो व्यक्ती बाईकवर बसला. शैलजाने त्याचे पाय पकडले.

लस घ्या आणि मालामाल व्हा! Vaccination नंतर Amazon कडून मिळणार कॅश, जाणून घ्या

याच दरम्यान त्यांच्यात झटापट झाली ओरडण्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात  आले. राहुल मुपणार असं या सराईत चोरट्याचं नाव आहे. राहुलचा साथीदार प्रकाश सोनावणे याने शैलजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळं सोनं घेऊन तो आधीच पसार झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात शैलेजा याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सावध राहा! या लोकांना Delta plus चा सर्वाधिक धोका; राज्याने जारी केला रिपोर्ट

पोलिसांनी तपास सुरू करत फरार चोरट्याचा शोध सुरू केला. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपी राहुल याची चौकशी करून अन्य दोन आरोपी प्रकाश सोनावणे आणि दीपक कदम या दोघांना कल्याण बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आणि चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करून तिघांना अटक केली आहे.

कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल  पोवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण,पोलीस अधिकारी संभाजी जाधव  यांच्या उपस्थितीत धाडस दाखवित चोरट्या पकडून देणाऱ्या शैलजा करदकर यांचा सत्कार करुन चोरीस गेलेले दागिने त्यांना परत करण्यात आले.

First published:

Tags: Kalyan