मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लस घ्या आणि मालामाल व्हा! Vaccination नंतर Amazon कडून मिळणार कॅश, जाणून घ्या प्रक्रिया

लस घ्या आणि मालामाल व्हा! Vaccination नंतर Amazon कडून मिळणार कॅश, जाणून घ्या प्रक्रिया

अलीकडे अनेक कंपन्यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी एकाहून एक सरस अशा आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.

अलीकडे अनेक कंपन्यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी एकाहून एक सरस अशा आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.

अलीकडे अनेक कंपन्यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी एकाहून एक सरस अशा आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : लोकांना लसीकरणाबाबत जागरूक करण्यासाठी कंपन्या अनेक आकर्षक ऑफर्स (offers) देत आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी एकाहून एक सरस अशा आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. आता अशा ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲमेझॉन (Amazon) या बड्या ई- कॉमर्स (E- Commerce) कंपनीचं नावही समाविष्ट झालं आहे. ॲमेझॉन कंपनी आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सना (Front line Workers) 500,000 डॉलरच्या (सुमारे 3.70 कोटी रुपये) रोख बक्षिसांसह, कार्स आणि सुट्ट्यांचं पॅकेज आदी बाबी बक्षीस म्हणून देणार आहे; मात्र त्यासाठी कोविड -19 प्रतिबंधात्मक लस घेतलेली असणं आवश्यक आहे.

    या स्पर्धेत कोण घेऊ शकतं भाग?

    ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ॲमेझॉन लसीकरण स्पर्धेअंतर्गत एकूण 18 बक्षिसं देणार आहे. या बक्षिसांचं एकूण मूल्य सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स आहे. यामध्ये 5 लाख डॉलर्सची (अंदाजे 3.70 कोटी रुपये) दोन रोख बक्षिसं, 1 लाख डॉलर्सची (अंदाजे 70 लाख रुपये) सहा बक्षिसं, पाच नवीन वाहनं आणि पाच व्हेकेशन पॅकेजेसचा (Vacation Package) समावेश आहे. ॲमेझॉनची ही स्पर्धा त्या कंपनीत काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्ससाठी आहे. ॲमेझॉनच्या फ्रंटलाइन वर्कर्समध्ये गोदामं (warehouse) आणि इतर वाहतूक (Logistics) सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. हे सर्व कर्मचारी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. तसंच होल फूड्स मार्केट (whole Foods Market), ॲमेझॉन फ्रेश किराणा स्टोअर्स (Amazon Fresh Kirana Stores) आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरमध्ये (Amazon web Services Data Center) प्रति तासावर काम करणाऱ्या कामगारांचाही त्यात समावेश आहे.

    हे ही वाचा-तीन महिन्यापूर्वी भयानक परिस्थिती, आता या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या Zero

    अमेरिकेत सध्या डेल्टा विषाणूचा (Delta Virus) वेगाने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने अमेरिकेतल्या गोडाउनमध्ये (Godwon) काम करणाऱ्या कामगारांना पुन्हा एकदा कामावर असताना मास्क (Mask) घालणं अनिवार्य केलं आहे. लसीकरण पूर्ण झालं असलं तरीही कामगारांना मास्क घालावाच लागणार आहे. ॲमेझॉनने अलीकडेच एका निवेदनात म्हटलं आहे, की 'अमेरिकेत कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटचा होणारा प्रसार पाहता, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, लसीकरण झालेलं असो वा नसो, आपल्याला घरामध्येसुद्धा मास्क घालणं आवश्यक आहे.'

    ॲमेझॉनच्या फ्रंटलाइन वर्कर्ससाठी या ऑफर्स उपयुक्त ठरणार आहेत.

    First published:

    Tags: Amazon, Corona vaccination, Employment