राज्यात आता डेल्टा प्लस थैमान घालू लागला आहे. ऑगस्टच्या 13 दिवसांतच डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
2/ 5
वयाचा विचार करता डेल्टा प्लसची लागण झालेले सर्वाधिक 33 रुग्ण 19 ते 45 या वयोगटातील आहेत. तर त्याखालोखाल 46 ते 60 वयोगटातील 18 रुग्ण आहेत. तर 18 वर्षांखालील 7 मुलांमध्येही याचं निदान झालं आहे.
3/ 5
60 पेक्षा जास्त वयाच्या फक्त 8 रुग्ण आहेत. तरुणांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींमध्ये कमी असलं तरी त्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे, असंच आकडेवारीवरून दिसून येतं. मृत्यू झालेले सर्वाधिक रुग्ण हे 60 पेक्षा जास्त वयाचेच आहेत.
4/ 5
लिंगाचा विचार करता पुरुष आणि महिलांचं प्रमाण जवळपास सारखंच आहे. पण पुरुषांपेक्षा महिला रुग्ण जास्त आहेत. 32 पुरुष तर 34 महिलांचा समावेश आहे.
5/ 5
कोरोना लस घेतलेले लोकही डेल्टा प्लसच्या विळख्यातून सुटलेले नाहीत. दोन्ही डोस घेतलेल्या 10 आणि एक डोस घेतलेल्या 8 जणांना डेल्टा प्लस झाला. फक्त दोघांनी कोवॅक्सिन घेतली आहे, तर इतरांनी कोविशिल्ड घेतली आहे.