मुंबई, 08 नोव्हेंबर : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने जोरदार आक्षेप घेत ठिकठिकाणी सिनेमे बंद पाडले आहे. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव वादात राज ठाकरेंची उडी घेतली असून कार्यकर्त्यांना नवे महत्त्वाची सूचना केली आहे. हर हर महादेव सिनेमावरून राजकीय आखाडा तापला आहे. ठिकठिकाणी सिनेमा बंद पाडला जात आहे. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना केली आहे. या सिनेमाबाबत कुणीही बोलू नका, चित्रपटाकडे फक्त चित्रपट म्हणून पाहा, अशी सूचना राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिली आहे. तसंच मनसेकडून ठाण्यात मोफत चित्रपटाच्या शोचं आयोजनही करण्यात आले आहे. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली होती. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. (जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात, ‘हर हर महादेव’ पाहायला आलेल्या प्रेक्षकाला NCP कार्यकर्त्यांकडून मारहाण) दरम्यान, विविआना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांनी बंद पडलेला चित्रपटात झालेल्या प्रकरणावरून ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे. 141,143,146,149,323,504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 इत्यादी कलम लावण्यात आले आहेत. ( औरंगाबाद : प्राचार्याने चोरले कॉलेजमधील 10 लाख अन् खेळला ऑनलाईन रमी ) फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिनेमा बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला. काय म्हणाले आव्हाड? हर हर महादेवचा शो सुरू असताना जितेंद्र आव्हाड अचानक थिएटरमध्ये आले आणि त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट न बघण्याचं आवाहन केलं. ‘इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची पुरंदरी परंपरा आहे. ब.म पुरंदरेंनी महाराष्ट्रात सुरू केलं ते आता सिनेसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण असे विकृत सिनेमे महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहिररित्या सांगतो’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.