जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; हर हर महादेवच्या दिग्दर्शकाची मागणी

प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; हर हर महादेवच्या दिग्दर्शकाची मागणी

अभिजीत देशपांडे

अभिजीत देशपांडे

हर हर महादेव या सिनेमावर होणाऱ्या टिकांवर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी मौन सोडलं आहे. तसंच प्रेक्षकांना झालेल्या मारहाणीबाबत माफी मागण्याची मागणी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 नोव्हेंबर : इतिहासाची मोड तोडून शिवाजी महाराजांवरचे सिनेमे तयार केले जात असल्याचा आरोप करत हर हर महादेव या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला. कालपासून पुणे त्यानंतर ठाण्यात हर हर महादेव सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन प्रेक्षकांना थिएटर बाहेर काढलं. तसंच प्रेक्षकांनी सिनेमा पाहू नये असं आवाहन देखील केलं. इतिसाहाची मोड तोड करून सिनेमा तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप हर हर महादेव सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केला आहे.त्याचप्रमाणे प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची आणि प्रेक्षकांची माफी मागावी अशी मागणी देखील अभिजीत देशपांडे यांनी केली आहे. या सिनेमात ज्या ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला जातोय ते मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारले होते. तेव्हा आम्ही त्यासंबंधी सगळे दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाला सबमिट केले गेले आणि त्यानंतर सेन्सॉरनं ते मान्य केलं.  म्हणून आम्हाला या विषयी काहीच बोलायचं नाहीये.  तसंच सिनेमा न पाहताच आक्षेप घेतला जातोय,असही अभिजीत देशपांडे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा - ‘हर हर महादेव’ सिनेमाचा वाद आणखी चिघळला; संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस तुम्हाला कोणता सीन पटला नाही पटला यावर आपण डिबेट करू शकतो.  तुम्हाला सिनेमातील कोणते फॅक्ट्स पटले नाही त्यावर आपण कोर्टात जाऊन समोरासमोर बोलू शकतो. पण असं थिएटरमध्ये जाऊन तुम्ही मारामारी करताय हे किती चुकीचं आहे यावर तुम्ही विचार करा.  ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण स्वत: ला भक्त म्हणवतो. ज्या महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणलं आपल्या सगळ्यांना माणूसकीचा संदेश दिला. आणि आपण त्या व्यक्तीच्या कुटुंबासमोर त्याला जाऊन मारहाण करतो तेव्हा आपण छत्रपतींचा किती अपमान करतो हे पाहावं आणि त्यासाठी महाराजांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असं अभिजीत देशपांडे म्हणालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात