मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुझा संसार होऊ देणार नाही', लग्न 8 दिवसांवर आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल, मन हेलावणारी घटना

'तुझा संसार होऊ देणार नाही', लग्न 8 दिवसांवर आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल, मन हेलावणारी घटना

Crime in Nanded: नांदेडमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आली. येथील एका तरुणाने विषारी औषध प्राशन (Young man commits suicide by drinking poison) करून आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 03 नोव्हेंबर: नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या हदगाव येथे मन हेलावणारी घटना समोर आली. येथील एका तरुणाने विषारी औषध प्राशन (Young man commits suicide by drinking poison) करून आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अलीकडेच संबंधित तरुणाचं लग्न ठरलं होतं. आठ दिवसांवर लग्न येऊन ठेपलं असताना, तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. ऐन दिवाळीत तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी मनाठा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अनिल शेषेराव जाधव असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नांदेड जिल्ह्याच्या हदगाव येथील बरडशेवाळा येथील रहिवासी आहे. मृत अनिल याचं काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका मुलीसोबत विवाह ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हे लग्न ठरलं होतं. त्यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची तारीख जवळ आल्याने दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. 10 नोव्हेंबर रोजी त्याचा विवाह संपन्न होणार होता.

हेही वाचा-4दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत;भयावह अवस्थेत आढळली महिला

दरम्यान, सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी अनिल याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आठवडाभरावर लग्न येऊन ठेपलं असताना, नवरदेव मुलानेच जगाचा निरोप घेतल्याने दोन्ही कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. दुसरीकडे, सुखी संसराची स्वप्न रंगवणाऱ्या मुलीच्या आयुष्यातही आंधार पसरला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी मनाठा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-गरोदर पत्नीसोबत क्रूरतेचा कळस;पतीने जिवंत पेटवल्याने पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

लग्न ठरल्यानंतर गेल्या काही काळापासून अनिलला कोणाचे तरी धमकीचे फोन येतं असल्याचा दावा मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. 'तुझा संसार होऊ देणार नाही' अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिल्याचंही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी मनाठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Husband suicide, Nanded