मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाणे हादरलं! गर्भवती पत्नीसोबत पतीने गाठला क्रूरतेचा कळस; जिवंत पेटवल्याने पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

ठाणे हादरलं! गर्भवती पत्नीसोबत पतीने गाठला क्रूरतेचा कळस; जिवंत पेटवल्याने पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

Crime in Thane: ठाण्यातील कळवा परिसरात क्रूरतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत पेटवलं (husband set pregnant wife on fire) आहे.

  • Published by:  News18 Desk

ठाणे, 03 नोव्हेंबर: ठाण्यातील (Thane) कळवा परिसरात क्रूरतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत पेटवलं (husband set pregnant wife on fire) आहे. या भयावह घटनेत पीडित महिला गंभीर जखमी (Injured) झाली असून तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत (Unborn baby dead) झाला आहे. पीडितेवर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या (Accused husband arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनिल चौरासिया असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून तो कळवा परिसरातील रहिवासी आहे. आरोपी अनिल आणि त्याची जखमी पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी अनिल याने अन्य एका तरुणीसोबत विवाह केल्याचा संशय जखमी पत्नीला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

हेही वाचा-4दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत;भयावह अवस्थेत आढळली महिला

दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी दोघांत पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं आहे. पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती असूनही आरोपीने तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपी पतीने रॉकेल टाकून पेटवल्याने पीडित महिला गंभीररित्या भाजली होती. या धक्कादायक घटनेनंतर शेजाऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मुंबईतील जे जे रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा-आई, पत्नीवर उपचार करू की मुलांना कपडे घेऊ, हवालदिल बसचालकानं केलं विष प्राशन

दुर्दैवाची बाब म्हणजे, पीडित महिलेचं संपूर्ण शरीर भाजल्यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Thane