• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भरधाव फॉर्च्युनर उसाच्या ट्रॅक्टरला धडकली, 3 जण जागीच ठार

भरधाव फॉर्च्युनर उसाच्या ट्रॅक्टरला धडकली, 3 जण जागीच ठार

जवळपास अर्धी फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला आहे. यातील मृतदेह क्रेनच्या साहाय्याने काढावी लागली

  • Share this:
इंदापूर, 08 फेब्रुवारी : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर (Pune Solapur National Highway) भरधाव फॉर्च्युनर (Fortuner) गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहे.  अपघातातील मयत व्यक्ती लातूर येथील रहिवासी आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ डाळज नंबर 2 च्या हद्दीत सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. भरधाव फॉर्च्युनर कार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीला पाठीमागून धडकली. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?' सचिनच्या घराबाहेर निदर्शनं उसाने दोन ट्राली भरलेला ट्रॅक्टर (एम.एच.45 एफ.7779) हा पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघाला होता. डाळज नं. 2 येथे त्याच दिशेने फॉर्च्युनर कार(एम.एच.24 एटी.2004)ही भरधाव वेगाने येऊन  ट्रालीला पाठीमागून धडकून हा अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की, जवळपास अर्धी फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला आहे. यातील मृतदेह क्रेनच्या साहाय्याने काढावी लागली. WeTransfer च्या माध्यमातून सुरू होतं पॉर्न व्हिडिओ रॅकेट; आणखी एकाला अटक या भीषण अपघातात लातूर येथील 3  जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गीता अरूण माने (वय 36 ) मुकुंद अरुण माने वय (53 ) अरुण बाबुराव माने वय (45) सर्व हे मयत झाले आहेत. तर साक्षी अरुण माने (वय 18) आणि महादेव रखमाजी नेटके हे अपघातात जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ भिगवण व पुणे येथे पाठवण्यात आले आहे. मात्र, तत्पूर्वीच तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत.
Published by:sachin Salve
First published: