मुंबई, 8 फेब्रुवारी : पॉर्नोग्राफिक व्हिडिओ प्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं मोठी कारवाई केली आहे. ऑल्ट बालाजीची अडल्ट सीरिज गंदी बातमध्ये (Gandii Baat) झळकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिला मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलनं ताब्यात घेतल्यानंतर आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई क्राइम ब्रान्चच्या प्रॉपर्टी सेलने या प्रकरणात एका मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला अटक केलं आहे. जो मुंबईत शूट झालेल्या पॉर्नोग्राफिक व्हिडिओ परदेशात कधी व कसं अपलोड करावयाचं याच्या कॉर्डिनेशनचं काम करीत होता. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव उमेश कामत आहे. पॉर्न मूव्हीचं चित्रिकरण प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ त्याला हा कंटेन्ट व्हि ट्रान्सफरवर अपलोड करत होती आणि ती लिंक परदेशातील अपलोडर आणि उमेशला पाठवत होती. ज्यानंतर उमेश ते व्हिडिओ कधी व कसे देशात अपलोड करावयाचे आहे, यावर कॉर्डिनेशनचं काम करीत होता.
WeTransfer या वेबसाइटच्या माध्यमातून जगभरात डेटा पाठविण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. ज्याच्या माध्यमातून 2 GB पर्यंतच्या फाइल्स मोफत शेअर केले जाऊ शकते. या वेबसाइटवरील डेटा 7 दिवसात आपोआप डिलीट होतो.
हे ही वाचा-पॉर्न व्हिडीओ रॅकेट प्रकरण: 20 मिनिटांच्या फिल्मसाठी दिले जात होते 30 हजार रुपये
उमेश यापूर्वी एका व्यावसायिकाकडे पीए म्हणून काम करीत होता. त्याची आज कोर्टात सुनावणी केली जाईल. आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आलं असून गेल्या आठवड्यापासून मुंबई क्राइम ब्रान्चची प्रॉपर्टी सेल या रॅकेटचा शोध घेत होती. ज्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला शनिवारी अटक करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार अनेक मॉडल्स सध्या प्रॉपर्टी सेलच्या रडारवर आहेत. ज्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहेत.
काय आहेत गहनावर आरोप?
गहनावर आपल्या वेबसाईटसाठी पॉर्न व्हिडिओ शूट करून अपलोड करण्याचा आरोप आहे. पोलीस सध्या इतर कलाकार, मॉडेल आणि प्रोडक्शन हाऊसचाही तपास करत आहेत. यांच्यावर अॅडल्ट फिल्म मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला आहे. मिस एशिया बिकनीचा मान पटकवणारी गहना वशिष्ठनं हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. वेबसाईटवर अश्लील कंटेट अपलोड करण्याबाबत शनिवारी दुपारी गहनाची चौकशी केली गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Cyber crime, Mumbai, Porn video, Sex racket