मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?' सचिनच्या घराबाहेर निदर्शनं

'आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?' सचिनच्या घराबाहेर निदर्शनं

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे.

मुंबई, 08 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाबाबत (Farmer Protest) ट्वीट (tweet) केल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (sachin tendulkar) सामना करावा लागला होता. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असं म्हणत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टर झळकावले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश प्रवक्ता रणजीत बागल याने सचिनच्या घराबाहेर एक पोस्टर घेऊन थेट जाब विचारला आहे. 'सचिन शेतकऱ्यांसाठी कधी ट्वीट करशील? असा फलक दाखवत बागल याने निदर्शनं केली आहे.

सचिनवर राग का?

जगभरात लोकप्रिय असलेली पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केलं. रिहानाच्या या ट्वीटवर उत्तर देत भारतातील अनेक सेलिब्रिटींनी तिला भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला. यामध्ये भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचाही समावेश होता. याच मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं होतं. 'देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या', सचिननं हे ट्वीट करताच भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विषयावर ट्वीट करत विदेशी मंडळींना सुनावलं आहे.

शरद पवारांचा सचिनला सल्ला

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर सचिन तेंडुलकरला सल्ला होता. 'लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे होत आहेत. त्यामुळे आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील,' असं वक्तव्य शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.

First published: