जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचे निधन, पार्थिव हॉस्पिटलला करणार दान

शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचे निधन, पार्थिव हॉस्पिटलला करणार दान

मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. टेमुर्डे 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात 2 वेळा त्यांनी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलं.

  • -MIN READ Chandrapur,Chandrapur,Maharashtra
  • Last Updated :

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 22 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचं 82 व्या वर्षी निधन झालं आहे. आज राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. टेमुर्डे 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात 2 वेळा त्यांनी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलं. 1991 -95 या काळात ते विधानसभा उपाध्यक्ष होते. ( खरी शिवसेना कुणाची? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले ) जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. (हेही वाचा :    गळतीनंतर शिवसेनेत इन्कमिंग, MIM च्या 3 माजी नगरसेवकांसह शिवसंग्रामाचे नेते शिवबंधनात! ) त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला सोपवण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात