मुंबई, 22 जानेवारी : शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे ? याची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना कुणाची याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. पण, खरी शिवसेना ही आमचीच आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना कुणाची? गेल्या सहा महिन्यांपासून गल्ली ते दिल्ली या प्रश्नावर लढाई सुरू आहे. लवकरच याचा निर्णय येण्याची चिन्ह आहे. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेबद्दल मोठ विधान केलं आहे. (सरकार कधी कोसळणार? पटोलेंनी तारीखच सांगितली; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश) ‘मुळ शिवसेना आपलीच आहे, त्यामुळे आपल्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना" असं नाव दिलं आहे. असंच आपण काम करत राहिलो तर पुढच्या वर्षात काय होणार या प्रश्नामुळे अनेकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे. धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार -दीपक केसरकर दरम्यान, धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केला. तसंच त्यांनी भारत जोडे यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. (हेही वाचा : गळतीनंतर शिवसेनेत इन्कमिंग, MIM च्या 3 माजी नगरसेवकांसह शिवसंग्रामाचे नेते शिवबंधनात! ) कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेचा आम्हाला पाठिंबा आहे. भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे याच्या प्रचार सभेत मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र आमदार पाटील यांनी अजून पाठिंब्याचा निर्णय झाला नसल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित आहे. मागील सरकारच्या काळात पण त्याला उशीर झाला होता असे देखील केसरकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.