मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गळतीनंतर शिवसेनेत इन्कमिंग, MIM च्या 3 माजी नगरसेवकांसह शिवसंग्रामाचे नेते शिवबंधनात!

गळतीनंतर शिवसेनेत इन्कमिंग, MIM च्या 3 माजी नगरसेवकांसह शिवसंग्रामाचे नेते शिवबंधनात!

 बीडमध्ये एमआयएमसह विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला मोठं खिंडार पडलं आहे

बीडमध्ये एमआयएमसह विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला मोठं खिंडार पडलं आहे

बीडमध्ये एमआयएमसह विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला मोठं खिंडार पडलं आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 22 जानेवारी : बीडमध्ये एमआयएमसह विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेना ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू झाली आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे देखील मोठे पाठबळ ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीडमध्ये एकीकडे शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना शिवसेना ठाकरे गटामध्येही इन्कमिंग सुरू झाले आहे.  एमआयएमसह शिवसंग्राम संघटनेला मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली, एमआयएम माजी जिल्हाध्यक्षांसह 3 एमआयएमचे नगरसेवक, संभाजी ब्रिगेड संघटनेच्या विभागीय अध्यक्ष, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलं आहे.

(सरकार कधी कोसळणार? पटोलेंनी तारीखच सांगितली; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश)

यामध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख, अमर शेख (नगरसेवक एमआयएम), हाफिज अश्फाक (नगरसेवक एमआयएम), मुन्ना इनामदार (नगरसेवक एमआयएम), सुदर्शन धांडे (प्रदेश सरचिटणीस शिवसंग्राम महाराष्ट्र), संतोष जाधव (मराठवाडा विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड संघटना), नंदू पिगंळे (शिवसंग्राम बीड), अयुब खॅान पठाण (बीड जिल्हा सरचिटणीस एमआयएम), मोमीन जुबेर ( माजी बीड शहर अध्यक्ष एमआयएम), शेख खय्युम इनामदार (माजी बीड जिल्हा अध्यक्ष एमआयएम युवक अघाडी), शेख खदीर (बीड शहर अध्यक्ष सॅा मिल सघंटना) यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

(शिंदे सरकारसोबत काम करण्याची संधी, 'मविआ'ने बंद केलेली योजना पुन्हा सुरू)

या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मुंबईतील मातोश्रीवर जाऊन प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या बीडमधील ठाकरे गटात सामील झालेल्या मावळ्यांना प्रवेश दिला.

दरम्यान, बीड जिल्ह्यात हे सर्व पदाधिकारी महत्त्वाचे समजले जातात. त्यामुळे बीड जिल्ह्यात एमआयएम, संभाजी ब्रिगेड संघटना त्याचबरोबर शिंदे गटाला हा मोठा धक्का समजला जात असून ठाकरे गटात आता बीडमधून इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे देखील मोठे पाठबळ ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

First published:

Tags: बीड