जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदारासह अनेक नगरसेवक आज शिंदेत गटात सामील होणार

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदारासह अनेक नगरसेवक आज शिंदेत गटात सामील होणार

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदारासह अनेक नगरसेवक आज शिंदेत गटात सामील होणार

नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे शिंदे गटात होणार सामील होणार आहेत.

  • -MIN READ Nandurbar,Maharashtra
  • Last Updated :

नंदूरबार 24 जुलै : शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही सेनेतील गळती थांबली नाही. शिवसेनेतील आमदारांनंतर 12 खासदारांनीही आपल्या वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासोबत अजूनही अनेक नगरसेवक तसंच राजकीय नेते एकनाथ शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. अशात आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.. आमदार, खासदारांनी सोडली साथ; शिवसेना वाचवण्यासाठी आता नगरसेवक सरसावले, काय आहे प्लॅन? नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे शिंदे गटात होणार सामील होणार आहेत. आज हजारो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थानी नंदनवन इथे ५ वाजता ते शिंदे गटात सामील होणार आहेत. नंदूरबार जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाला समर्थन देणारे फॉर्म या सगळ्यांनी पाच दिवसांपुर्वी भरुन दिले आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे 24 जुलैला म्हणजेच आज संध्याकाळी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात दाखल सामील होणार आहेत. Shiv Sena Divakar Ravate : ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची आत्महत्या झाली आहे, असे वाटले पाहिजे दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा दुसरीकडे नाशिकचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास ते उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात