मुंबई, 20 जानेवारी : राज्यात नेत्याच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. आता माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरनं धडक दिली आहे. या अपघातामध्ये दीपक सावंत जखमी झाले आहेत, त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सावंत यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते, याचवेळी काशिमीरा भागत त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातामध्ये सावंत जखीम झाले असून, कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
कुठे आणि कसा झाला अपघात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते, याचवेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातामध्ये सावंत जखीम झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामध्ये त्यांच्या कारच देखील मोठं नुकसान झालं आहे.
नेत्यांच्या अपघाताचं सत्र सुरूच
राज्यात नेत्यांच्या अपघाताच सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवलं. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला, आणि आता माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.