जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने उडवले, डोक्याला पडले 4 टाके, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने उडवले, डोक्याला पडले 4 टाके, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली.

आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली.

आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 11 जानेवारी : प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात बच्चू कडू थोडक्यात बचावले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली. याा धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. (‘राज्यसभा निवडणुकीत सेनेचे एक मत फोडण्यासाठी 5 ते 10 कोटींचे ‘गंगास्नान’, सेनेचा भाजपवर थेट आरोप) दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांना अपघात झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.

News18लोकमत
News18लोकमत

तर, 6 जानेवारी रोजी आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. यात आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच चालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. मात्र, हा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात