मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्धव ठाकरेंनी टाकला डाव; संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान; माजी काँग्रेस आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंनी टाकला डाव; संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान; माजी काँग्रेस आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Santosh Tarfe) हे आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hingoli, India

(मनीष खरात, प्रतिनिधी) हिंगोली 29 ऑगस्ट : हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करतील. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोन्ही नेते शिवबंधन बांधणार आहेत.

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी; VIDEO समोर येताच महावितरणाने केली कारवाई

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर हिंगोलीत राजकीय उलथापालथ होत आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे हे आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेनं कळमनुरी मतदारसंघात कडवं आव्हान निर्माण करण्यासाठी चांगलीच व्यूहरचना रचली आहे. सोमवारी म्हणजेच आज डॉ.टारफे आणि अजित मगर हे दोघे दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पोहोचणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. पक्ष प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे टारफे म्हणाले आहेत.

'विहिरीत उडी घेईल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही'; नितीन गडकरी असं का म्हणाले? सांगितला तो किस्सा

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता शिवसेनेनं याठिकाणी आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे आता संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करत आहेत.

First published:

Tags: Mla, Shivsena