मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'विहिरीत उडी घेईल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही'; नितीन गडकरी असं का म्हणाले? सांगितला तो किस्सा

'विहिरीत उडी घेईल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही'; नितीन गडकरी असं का म्हणाले? सांगितला तो किस्सा

गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, की मी जिचकार यांना उत्तर दिलं, की 'मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर 29 ऑगस्ट : नितीन गडकरी यांनी नुकतंच नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना आपण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, की 'विद्यार्थी जीवनात काम करत असताना दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.'

पंतप्रधानांचे शब्द अन् कृती जुळत नाही; मोदींच्या त्या वक्तव्यावरुन राहुल गांधीचा निशाणा

या ऑफरवर नितीन गडकरी यांनी त्यावेळी दिलेलं उत्तर त्यांनी नागपुरातील कार्यक्रमात बोलताना सांगितलं. गडकरी म्हणाले, की मी जिचकार यांना उत्तर दिलं, की 'मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही'

नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगून सध्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर तसंच इतरही काही कारणांमुळे नितीन गडकरी नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. आपल्या एका भाषणात गडकरींनी सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना आजकाल राजकारण समाजकल्याणासाठी राहिलं नसून सत्तेसाठी असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर नितीन गडकरी पक्षातून बाहेर पडणार का? अशी चर्चा होती. मात्र, एकप्रकारे गडकरींनी पुन्हा एकदा हा किस्सा सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि...', गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

परंतु, यावेळी गडकरी यांनी युवा उद्योजकांना सल्ला दिला, जो अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा असल्याचंही म्हटलं जात आहे. गडकरी म्हणाले, की 'कोणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका. उगवत्या सूर्याची पूजा करू नका. युज अॅण्ड थ्रो पॉलिसी चांगली नाही, असंही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

First published:

Tags: BJP, Nitin gadkari