पुणे,5 मार्च: कॅबमध्ये महिलांवर होणारा अत्याचार, छेडछाड तसेच अभद्र वर्तवणुकीची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. परंतु यावेळी कॅब ड्रायव्हरबाबत वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. याबाबत तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही घटना पुण्यातील आहे. एका महिलेने मुंबईला जाण्यासाठी उबर कार मागवली. काही तास कार चालवल्यानंतर ड्रायव्हरला वाटेतच झोप लागत होती. त्याला कार चालवणे अवघड झालं होतं. ही बाब महिलेच्या लक्षात आली. तिने ड्रायव्हरला झोपण्यासाठी सांगितलं आणि स्वत: जवळपास 150 किलोमीटर कार चालवून मुंबईत पोहोचली. ही घटना 21 फेब्रुवारीची आहे. तेजस्विनी दिव्या नाईक (28) या तरुणीनं घटनेचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. व्हिडिओच्या माध्यमातून तेजस्विनीनं उबर कंपनीकडे ड्रायव्हरची तक्रार केली आहे. तिनं सांगितलं की, त्यांनी पुण्याहून अंधेरीला (मुंबई) जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती. सुरुवातीला तर ड्रायव्हर कार चालवताना सलग फोनवर बोलत होता. त्याला हटकल्यानंतर त्याने फोनवर बोलणे थांबवलं. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर ड्रायव्हरला झोप येत होती. एकदा तर अपघात होता होता वाचला. हेही वाचा.. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट
thanking god I’m alive right now and I wasn’t asleep when this happened & that I know how to drive.@Uber @Uber_Support @Uber_India I am seething with anger right now. how dare they drive if they’re not well rested? how dare they put anyone else’s life at risk?
— tejaswinidivyanaik (@tejaswininaik27) February 21, 2020
part 1 #uber pic.twitter.com/lUUFXpHCQS
हेही वाचा.. गेल्या वर्षात महाराष्ट्रात दीड लाख नोकऱ्या झाल्या कमी तेजस्विनीने सांगितलं की, तिने ड्रायव्हरला म्हटलं, तुला काही वेळ झोपायचं असेल तर झोप मी कार चालवून घेईल. सुरुवातीला त्याने नकार दिला मात्र, त्याला झोप सुधारत नव्हती. अखेर तेजस्विनीने स्टेअरिंग हातात घेतले. उबर कंपनीने तेजस्विनीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ड्रायव्हरला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. कंपनीने या प्रकाराबाबत तेजस्विनीची माफी देखील मागितली आहे. तेजस्विनीनं पुरावा म्हणून ड्रायव्हरचा फोटो आणि व्हिडिओ बनवून पाठवला होता. हेही वाचा.. ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका…’ मालिकांमधील वादात शशांक केतकरची उडी काय म्हणाली तेजस्विनी..? अर्धा तासाचा रस्ता बाकी असताना ड्रायव्हरला जाग आली. नंतर तो कार चालवू लागला. तोपर्यंत तेजस्विनीने उबरकडे तक्रार दिली होती. उबरचे तेजस्विनीला ईमेलवर उत्तरही मिळालं होतं. ड्रायव्हरला निलंबित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. तसेच कंपनीने माफी मागितली आहे. तेजस्विनी एक लेखिका असून सिनेमांसाठी ती कथानक लिहिते.