मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /..म्हणनू संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेतलं; विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

..म्हणनू संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेतलं; विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड (Sanjay Rathod) यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड (Sanjay Rathod) यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड (Sanjay Rathod) यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 09 ऑगस्ट : शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेऊन 35 हून अधिक दिवस झाले असून अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या विस्तारावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद देणे हे अत्यंत दुर्दैवी', चित्रा वाघ संतापल्या, भाजपला घरचा अहेर

खातेवाटपातही समसमान वाटा असेल का? असा सवाल केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, आता आम्ही युती म्हणून एकत्र आलो आहोत. संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एका माध्यमाशी बोलताना शिंदे यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. आणखी कुणाला काही म्हणायचे असेल तर त्यांनी सांगावे, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी राठोड यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे राठोडांना मंत्रिमंडळात घेतले. जर कुणाच्या काही सुचना असेल तर त्या घेतल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर काही आमदार नाराज असल्याचं समोर येत आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिला. शिंदे म्हणाले, की मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी होणार आहे. त्यामुळे इतरांचा समावेश केला जाईल. हे आमचे सरकार लोकाभिमुख आहे. कामातून आम्ही उत्तर देऊ. राज्याला केंद्राचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मी धन्यवाद देईल.

Cabinet Expansion : शपथविधीत अपक्षांचा हाती नारळ? बच्चू कडूंनी दिला थेट इशारा

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातून संजय शिरसाट यांचं नाव वगळ्यात आलं. यामुळे शिरसाट नाराज असल्याचं समोर येत होतं. यावरही शिंदेंनी उत्तर दिलं. संजय शिरसाट हे काही नाराज नाही. ते शपथविधी सोहळ्याला बसलेले होते. आपल्याकडे थोडीच मंत्रिपदं होती. आता सगळे समजदार आहेत, ते समजून घेतील. ही एक प्रक्रिया आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे. पुढच्या टप्प्याचा लवकरच विस्तार होईल, असंही शिंदेंनी यांनी सांगितलं .

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Sanjay rathod