मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cabinet Expansion : शपथविधीत अपक्षांचा हाती नारळ? बच्चू कडूंनी दिला थेट इशारा

Cabinet Expansion : शपथविधीत अपक्षांचा हाती नारळ? बच्चू कडूंनी दिला थेट इशारा

'अपक्ष आमदार आणि मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही. निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे.

'अपक्ष आमदार आणि मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही. निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे.

'अपक्ष आमदार आणि मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही. निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 09 ऑगस्ट : कधी होणार, कधी होणार म्हणत अखेर 39 दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार  (Maharashtra Cabinet Expansion)  आज होणार आहे. एकूण 18 जणांची नाव समोर आली आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्यात अपक्षांना तुर्तास स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अपक्ष आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी घटक पक्षांशिवाय सरकार चालू शकणार नाही, असा इशाराच दिला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याआधी सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाची बैठक पार पडली. यावेळी बच्चू कडू यांनी कमाली नाराजी दर्शवली. असला तरी चांगलं आणि नसलं तरी चांगलं आहे. मंत्रिपदासाठी नाव चर्चेत येण्यापेक्षा शेतकरी आणि अपंग बांधवासाठी काम केले तर चांगले आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांना भेटल्यानंतर निर्णय होणार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. 'अपक्ष आमदार आणि मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही. निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे. शेतकरी बांधव आणि अपंग बांधवांचं भलं झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आलो आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. त्यामुळे अपक्ष आमदार आणि मित्रपक्षांचा समावेश होईल की नाही, या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. इच्छुक आमदार हे मुंबईत दाखल झाले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंगळवारपर्यंत ९ जण शपथ घेणार अशी शक्यता होती. पण रात्रभरात हालचालींना वेग आला. शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावे वाढवणे सुरू आहे. रात्री पर्यंत ८ भाजपा आणि ८ शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा अब्दुल सत्तार आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, पूजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रिपद गमावलेले संजय राठोड यांचे नाव सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. संजय राठोड सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. एकूण १८ मंत्री शपथ घेतील शिंदे गटाकडून हे मंत्री घेणार शपथ दादा भुसे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील उदय सामंत शभुराजे देसाई तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड भाजपकडून हे नेते घेणार शपथ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित सुरेश खाडे अतुल सावे मंगल प्रभात लोढा
First published:

पुढील बातम्या