मुंबई, 09 ऑगस्ट : पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अखेर 39 दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भावी मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत आहे. यावेळी संजय राठोड यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. संजय राठोड यांना शपथ देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB
संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
Maharashtra Cabinet expansion | 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/1vUX6e2yoy
— ANI (@ANI) August 9, 2022
महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. भाजपच्या नेत्यांनीही संजय राठोड विरोधात आंदोलनं केली होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वनमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते. मध्यंतरी, महाविकास आघाडी सरकारने पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळवापसीची चर्चा रंगली होती. पण, शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे संजय राठोड शिंदे गटात सामील झाले. आज शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे.