मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गळ्यात भगवा रुमाल, शिवसेनेच्या आमदारविरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल

गळ्यात भगवा रुमाल, शिवसेनेच्या आमदारविरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल

बांगर यांचासह अन्य 13 जणांविरोधामध्ये कारवाई करत औंढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बांगर यांचासह अन्य 13 जणांविरोधामध्ये कारवाई करत औंढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बांगर यांचासह अन्य 13 जणांविरोधामध्ये कारवाई करत औंढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

परभणी, 21 डिसेंबर :परभणीमध्ये आता नगरपंचायतीसाठी शांतेत मतदान पार पडले. मात्र कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Shivsena MLA Santosh Bangar) यांच्याविरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा पोलीस ठाण्यात बांगर यांच्यासह अन्य 13 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरोधामध्ये औंढा पोलीस ठाण्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बांगर यांच्यासह अन्य 13 जणांवर ही हेच आरोप ठेवण्यात आले आहेत.

पाळीव कुत्र्याला धडक देणं महागात, कोर्टाकडून 3 लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश

आज औंढा नगरपंचायतीसाठी मतदान झाले. या मतदानाच्या दरम्यान, शहरातील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयात बनवण्यात आलेल्या मतदान केंद्रावर, आमदार बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अनधिकृत प्रवेश केला आणि त्यामुळे प्रशासनाने, बांगर यांचासह अन्य 13 जणांविरोधामध्ये कारवाई करत औंढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्याला समंथाचं उत्तर; म्हणाली,'देव तुमच्या आत्म्या...'

दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये, गळ्यामध्ये भगवा रुमाल टाकून आणि मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी हा प्रवेश केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन सध्यातरी कॅमेरा समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. परंतु, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

 106 नगरपंचायतीसाठी 76 तर पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान

 

दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी आज सरासरी 76 टक्के मतदान झालं आहे. तर भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के तसंच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज हे मतदान झाले.

First published:

Tags: Shivsena