हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 21 डिसेंबर : आपला देश हा भूतदयावादी आहे. प्राणी-मात्रांवर प्रेम करावं, असे विचार आपल्या पूर्वजांनी आणि साधू-संतांना आपल्यामध्ये रुजवले आहेत. पण काही विकृत माणसं प्राणी-मात्रांवर अन्याय करतात. त्यांच्यासोबत वाईट पद्धतीने वागतात. पण निष्पाप प्राण्यांवर कोणताही अन्याय या देशात होऊ नये यासाठी कायदा देखील तितकाच कडक आहे. याचं दर्शन चंद्रपुरात बघायला मिळालं आहे. चंद्रपुरात काही वर्षांपूर्वी एका स्कूलबसने एका पाळीव कुत्र्याला धडक दिली होती. हे प्रकरण स्कूलबस चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण कोर्टाने मृतक कुत्र्याच्या मालकाला तीन लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बसने कुत्र्याला उडविल्यावर मृतक लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूसाठी तीन लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश चंद्रपुरात न्यायालयाने दिला आहे. चंद्रपूर शहरातल्या तुकूम परिसरातील ही घटना आहे. उमेश भटकर असं मालकाचे तर 'जॉन' असं कुत्र्याचे नाव आहे.
हेही वाचा : ओबीसी आरक्षण ते एसटी कर्मचारी संप, सरकार अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार : अजित पवार
तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर हे 10 जानेवारी 2013 ला सकाळी आपल्या 11 महिन्यांच्या लाडक्या कुत्र्याला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते. त्यावेळी एका भरधाव स्कूलबसने त्यांच्या कुत्र्याला धडक दिली. या अपघातात कुत्र्याचा मृत्यू झाला होता. हा कुत्रा भटकर कुटुंबाचा लाडका कुत्रा होता.
भटकर कुटुंबाने तब्बल आठ तास न्यायालयीन लढाई लढली
भटकर कुटुंबाने आपले दुःख बाजूला ठेवत लाडक्या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याचे ठरवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल 8 वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अखेर अपघाताला दोषी असलेला बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून 3 लाख रुपये भरपाई मिळवली.
हेही वाचा : सरकारने दारुचे दर कमी का केले? अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण
अपघातातील आरोपीने कुत्र्याच्या मालकाला एकूण 3 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. अंसारी यांनी दिला आहे. बसचालकांना वेगाविषयी अद्दल घडावी यासाठी हा संघर्ष केल्याची भावना भटकर यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.