जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यास समंथा प्रभूचं उत्तर; म्हणाली, 'देव तुमच्या आत्म्याला...'

घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यास समंथा प्रभूचं उत्तर; म्हणाली, 'देव तुमच्या आत्म्याला...'

घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यास समंथा प्रभूचं उत्तर; म्हणाली, 'देव तुमच्या आत्म्याला...'

‘द फॅमिली मॅन 2’ फेम समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यापासून समंथाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर- ‘द फॅमिली मॅन 2’ फेम समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो इन्स्टावर चाहत्यांसाठी शेअर करत असते. समंथा ‘पुष्पा’चा’ (Pushpa) सिनेमात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) डान्स करताना दिसत आहे. ‘ओ अंतवा’ हे गाणं समांथाच्या कारकिर्दीतील पहिले आयटम नंबर आहे. या गाण्यामुळे सद्या ती ट्रेंडिगमध्ये आहे. सोशल मीडियावर समंथाच्या डान्सचीच चर्चा रंगलेली आहे. सर्वजण समंथाचे या गाण्यासाठी कौतुक करत आहेत. अशातच एका ट्वीटरकर्त्याने तिच्यावर घटस्फोटावरून वाईट शब्दात टीका केली आहे. समंथा सहसा तिच्या सोशल मीडिया ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. पण यावेळी गप्प न बसता ट्विटर वापरकर्त्याला अगदी सोप्या पण तितक्याच कडक शब्दात उत्तर दिले आहे. सध्या समंथाच्या या ट्वीटची जोरदार चर्चा रंगलेली आहे. समंथाने या ट्वीटरकर्त्याचे ट्वीट रीट्वीट करत  त्याला सुचक शब्दात उत्तर दिले आहे. तिनं म्हटले आहे, “देव तुमच्या आत्म्याला आशीर्वाद देवो.” असं म्हणत तिनं या ट्रोलर्सची खऱ्या अर्थाने बोलती बंद केली आहे. कमर्ली दुकानदार या ट्वीटरकर्त्यानी घाणेरडी भाषा वापरून कमेंट केली आहे. यावर अगदी शांतपणे समंथाने उत्तर दिले आहे.

जाहिरात

लग्नाच्या चार वर्षानंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) आणि अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनी (Naga Chaitanya) यांचं जोडपं टॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक होते. ही जोडी अनेक चाहत्यांची लाडकी आहे. आठ वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र नागा चैतन्य आणि समंथा विभक्त झाली आहेत. तेव्हापासून समंथाला तिच्या घटस्फोटावरून वारंवार ट्रोल केले जाते. मध्यंतरी कतिरना व विकीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यानंतर देखील ट्रोलर्सनी तिला घटस्फोटावरून सुनावलं होते. नेहमी संयमाने घेणाऱ्या या अभिनेत्रीने यावेळी साध्या आणि सरळ भाषेत ट्रोलर्सला उत्तर देत त्यांचे तोंड बंद केले आहे. सध्या तिच्या उत्तराची चर्चा रंगलेली आहे. वाचा- ‘Nikki Tamboli’ चे नशिब खुललं, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री यापूर्वीही ट्रोलर्संना दिलं आहे उत्तर पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यापासून समंथाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. समंथाचं अफेअर होते, तिला मूल नको होतं म्हणून तिनं गर्भपात केला होता, असे अनेक आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शुक्रवारी (8 ऑक्टोबर) रोजी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करून तिनं आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्यावरच्या आरोपांना उत्तरदेखील दिलं आहे. ‘माझ्या कठीण काळात तुम्ही मला साथ दिलीत, त्यामुळे मी भारावून गेले आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझं अफेअर सुरू होतं किंवा मी संधीसाधू आहे आणि मी गर्भपात केला, असे आरोप माझ्यावर झाले. असे आरोप आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अतिशय वेदनादायक आहेत; मात्र अशा आरोपांमुळे मी माझं खच्चीकरण होऊ देणार नाही. यातून बाहेर पडण्यासाठी मला एकटीला वेळ द्या,’ अशा आशयाचा मजकूर समंथानं शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात