मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्याच्या आत्महत्येची चर्चा, सुशांतप्रकरणी राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य

ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्याच्या आत्महत्येची चर्चा, सुशांतप्रकरणी राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य

ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची जोरदार चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळे याच्या आत्महत्येबद्दल साधी चर्चा नाही

  • Published by:  Sandip Parolekar
नाशिक, 29 ऑगस्ट: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची जोरदार चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळे याच्या आत्महत्येबद्दल साधी चर्चा नाही, हे दुर्दैवी आहे, असं सांगत राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे. हेही वाचा...तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? नागपूरच्या उपमहापौरांनी दिला अल्टीमेटम दुधाला दरवाढ मिळावी यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मात्र, त्याबाबत गुन्हा दाखल होतोय तो होऊ द्या आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी शनिवारी नाशिकमध्ये आहेत. आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणारच, असंही राजू शेट्टी यांनी सांगितले. सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे, असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केला. सरकारने 6 एप्रिल पूर्वी दूध संघाचं संकलन आणि नंतरचे संकलन याचे ऑडिट करावं. उत्पादकांच्या नावावर सरकारचा दूध केंद्रांवर डल्ला मारला, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. भाजपलाही टोला... मंदिर, मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा, असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला. देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मशीद उघडणं महत्वाचे नाही, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...SSR Case Update : सीबीआयच्या मागणीनंतर मुंबई पोलीस देणार रियाला सुरक्षा गायींना ओढत आणलं म्हणून राजू शेट्टींसह 40 जणांवर बारामतीत गुन्हा दुसरीकडे, गायींना ओढत आणलं म्हणून राजू शेट्टी यांच्यासह 40 जणांवर बारामती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून या आदेशाचे उल्लंघन केलं. याशिवाय मोर्चात जनावरं आणली होती, यावेळी जनावरांचे हाल केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख 11 आयोजक व इतर 40 जणांविरोधात बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

Tags: Raju shetty, Sushant Singh Rajpoot, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या