मुंबई, 29 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) सीबीआय चौकशी करत आहे. शुक्रवारी याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी झाली. रियाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुरक्षा पुरवावी अशी मागणी सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआयने याबाबत मुंबई पोलिसांकडे मागणी केली असून सांताक्रूज पोलीस रियाला सुरक्षा देणार आहेत. तिचा जबाब नोंदवण्याकरता येताना घरापासून डीआरडीओ (DRDO) गेस्ट हाऊसपर्यंत ही सुरक्षा देण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांमुळे रियाने सुरक्षा देण्याची मागणी केली होती. न्यूज18 लोकमतच्या सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (SSR Death Case) सीबीआयने शुक्रवारी मुख्य आरोपपत्र असणाऱ्या रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) जवळपास 10 तास दीर्घकाळ चौकशी केली. सीबीआयने समन बजावल्यावर रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसवर चौकशीकरता दाखल झाली होती. रिया व्यतीरिक्त सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह, दीपेश सावंत,सॅम्युअल मिरांड आणि केशव यांची देखील चौकशी झाली. सीबीआयच्या प्रश्नोत्तरानंतर सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंतर सरकारी साक्षीदार बनण्यास तयार आहेत.
(हे वाचा-SSR Case : संजना सांघीची #Metoo प्रकरणी होऊ शकते चौकशी, अडचणी वाढण्याची शक्यता)
सीबीआयच्या 10 तासांच्या चौकशीनंतर रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसबाहेर पडली. यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील तिच्याबरोबर उपस्थित होता. सीबीआय चौकशीनंतर रिया डीआरडीओ ऑफिसमधून बाहेर पडली मात्र ती घरी नाही गेली. याठिकाणाहून रिया थेट सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, जिथे रियाबरोबर तिचा भाऊ शौविक देखील उपस्थित होता. सुशांतच्या मृत्यूबाबत सुरू झालेल्या सीबीआय चौकशीच्या आठव्या दिवशी रियाला चौकशीकरता बोलावण्यात आले होते. तिची जवळपास 10 तास चौकशी झाली.
(हे वाचा-सारासह या 7 लोकांबरोबर बँकॉक गेला होता सुशांत, रियाने उपस्थित केला हा मुद्दा)
काही मीडिया अहवालांच्या मते सीबीआयद्वारा विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर रिया चक्रवर्तीने ड्रग चॅटची बाब कबूल केली असावी, अशी शक्यता आहे. रियाला पुन्हा एकदा सीबीआय चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.