मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? भाजप नगरसेविका आक्रमक, उपमहापौरांनी दिला अल्टीमेटम

तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? भाजप नगरसेविका आक्रमक, उपमहापौरांनी दिला अल्टीमेटम

 'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', असा धक्कादायक आरोप करणारे नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता

'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', असा धक्कादायक आरोप करणारे नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता

'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', असा धक्कादायक आरोप करणारे नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता

नागपूर, 29 ऑगस्ट: 'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', असा धक्कादायक आरोप करणारे नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी असा आरोप करून महिलांचा अवमान केला आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेविका पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा नागपूर महापालिकेच्या उपमहापौर मनिषा कोठे यांनी दिला आहे. हेही वाचा...VIDEO : बदलीनं प्रश्न सुटणार असतील तर बदली करा - तुकाराम मुंढे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातील तुकाराम मुंढे यांनी माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडवण्यात आल्याचं सांगताना महिलांबाबत आरोप केला. तुकाराम मुंढेंनी केलेल्या आरोपांवरून भाजप नगरसेविकांनी संताप व्यक्त केला. मुंढेंनी याबाबतचे पुरावे देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय मुंढेंनी त्याचवेळेस पोलिसांत तक्रार का केली नाही, असा सवालही उपस्थित केला. दरम्यान, माजी मुंढेंनी मात्र आपण असं बोललो नसल्याचं सांगितलं आहे. काय म्हणाले होते तुकाराम मुंढे? तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, ही काही त्यांची पहिली बदली नाही आहे. कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठता आणि तत्त्वांमुळे ते कायमच चर्चेत राहतात. यावेळी झालेल्या बदलीनंतर एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही वर्षात मी माझा आक्रमकपण कमी केला. माझ्या स्वभावाला मुरड घातली पण यापुढे माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही, असं ठाम मत तुकाराम मुंढे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. इतकंच नाही तर, मी माझ्या तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्याच पाठीत मीच खंजिर खुपसल्यासारखं होईल, असंही मुंढे यांनी सांगितलं. 'मी नेमका काय गुन्हा केला होता की, माझी बदली करण्यात आली' असा थेट सवालही तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, 'नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहननाचे प्रकार करण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले', असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. दररोज माझ्याविरोधात आरोप केले जात होते. मला ठरवून टार्गेट केलं जात होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. असं सगळं कोण करणार? ही भाजपचीच लोकं होती? दुसरं कोण करणार? असा सवालही यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला. हेही वाचा...'मुंबईची लोकल सुरू करा, अन्यथा...' डबेबाल्यांनी सरकारकडे मोठी मागणी दरम्यान, तुकाराम मुंढे हे सध्या कोरोनाबाधित असून नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मुंढे यांच्या या खुलाशामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खरंतर, याआधी भाजपचं सरकार असतानाही मुंढे यांची वारंवर बदली करण्यात येत होती.
First published:

Tags: Tukaram mundhe

पुढील बातम्या