Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीत जाताच 'चॉकलेट'वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार

राष्ट्रवादीत जाताच 'चॉकलेट'वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार

भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरू

जळगाव, 26 ऑक्टोबर: भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, अशी विखारी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. आता या टीकेला एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, अनुभवातून चंद्रकांत पाटील असं वक्तव्य करत आहेत. भाजपमध्ये 60 टक्के लोक हे बाहेरून आलेले असून यांना चॉकलेट देऊनच आणण्यात आलं असल्याचा टोला खडसे यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आपण दसऱ्यानिमित्त घरी भेटीसाठी येणाऱ्या सर्वांना चॉकलेट दिलं असल्याचेही खडसे मिश्किलपणे म्हणाले. हेही वाचा..'खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये' दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. 'चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात', अशी टीका खडसे यांनी केली. फुकट मिळालं नाही, मनगटाच्या जोरावर मिळवलं... एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, भाजपमध्ये काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी माझं 40 वर्षाचं आयुष्य खर्ची घातलं. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं, अशी टीका करतानाच कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही त्यांनी केला. म्हणून मी पक्ष सोडला... भाजपमध्ये छळ झाला, बदनामी झाली, म्हणून आपण भाजपला रामराम ठोकल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझा भूखंडाशी काहीही संबंध नसताना माझी चौकशी करण्यात आली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराचे कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी करणार. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पुराव्याशिवाय मी कोणतेही आरोप केले नाहीत, असंही यावेळी खडसेंनी सांगितलं. हेही वाचा...‘पुन्हा टीका केलीत तर ‘मातोश्री’वर काय चालतं ते बाहेर काढणार’, राणेंचा थेट इशारा चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते? 2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी सांगावं. तुमच्याकडेही अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही समाधान होतं. त्यामुळे आता त्यांना तो लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथाभाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असं म्हणतात, हे पाहावं लागेल”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि खडसेंवर निशाणा साधला होता. तसेच, “एकट्या देवेंद्रजींना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात”, असंही ते म्हणाले होते.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Eknath khadse, Maharashtra, NCP

पुढील बातम्या