मुंबई, 26 ऑक्टोबर: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. आता भाजपनं मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा, एका अभ्यासशून्य व सूडाने प्रेरित भाषणातून सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग? असा टोला देखाल चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
हेही वाचा...आदित्य ठाकरेंना 'बेबी पेन्ग्विन' म्हणणाऱ्याला अटक, अमृता फडणवीसांनी केली पाठराखण
चंद्रकांत पाटील यांनी 'सोयीचे हिंदुत्व' अशी फेसबुक पोस्ट लिहून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. कालच्या भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्त्वाच्या नावानं गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्त्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवलं, बाळासाहेबांच्या नावानं अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? असा सवाल करत खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालण करणं तुम्ही विसरला आहात, अशी टीका केली. आहे.
दसरा मेळाव्यात काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.
आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.
मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते.मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.
पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं.
हेही वाचा...हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अजितदादांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, म्हणाले.
महाराष्ट्र द्वेष पसरवला जोतोय त्यामुळे सावध रहा. देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपा हा मित्रपक्ष पण इमान नका राखू पण किमान मातीशी इमान राखा. अहंकारी राजा आणि कळसु्त्री बाहुल्यांचा खेळ येथे चालणार नाही. कोरोना संकट असताना केवळ पाडापाडी करून सरकार पाडण्याच काम होत असेल तर अराजक वाटचाल आहे.
मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याची त्यांनी काळजी करू नये. पण त्यावरून राज्यात फुट पाडण्याचं राजकारण यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.