‘पुन्हा टीका केलीत तर ‘मातोश्री’वर काय चालतं ते बाहेर काढणार’, राणेंचा थेट इशारा

‘पुन्हा टीका केलीत तर ‘मातोश्री’वर काय चालतं ते बाहेर काढणार’, राणेंचा थेट इशारा

वाघ हा घरात बसत नसतो तर तो मैदानात असतो. शिवसेनेत असताना आम्ही अंगावर केसेस घेतल्या यांनी काय केलं ते सांगावं असंही राणे म्हणाले.

  • Share this:

मुंबई 26 ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर आता भाजपकडून जोरदार हल्लाबोल होत आहेत. भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. आमच्या नादी लागू नका. पुन्हा राणे कुटुंबीय आणि भाजपवर हल्ला केला तर सगळेच बाहेर काढू, तुम्हाला पळता भुई थोडी होईल असा इशारा राणे यांनी दिला. मी शिवसेनेत 39 वर्ष होतो त्यामुळे मातोश्रीच्या आतलं बाहेरचं सगळच मला माहित आहे असंही ते म्हणाले.

राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कशाचीही माहिती नाही. या राज्यात महाराष्ट्रमध्ये जे मुख्यमंत्री झाले त्याची भाषा आणि विचाराने महाराष्ट्रची प्रतिमा उंचावली. मात्र उद्धव ठाकरे यांचं भाषण हे प्रतिमा खालावणारं होतं. कालच्या भाषणात निर्बुद्धता दिसली . शेती, करोनचा उल्लेख का नाही. राज्य दिवाळखोरीत आहे.  यांची मुख्यमंत्रिपदाची पात्रता नाही अशी टीकाही केली.

बेडूक कोणाला म्हणालात? शिवसेनेत 39 वर्ष होतो, माझी लायकी होती म्हणून मुख्यमंत्री केलं. बाळासाहेबांना यांनी छळलं असा आरोही त्यांनी केला.

सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नाही तर खून आहे, लवकरच सगळं बाहेर येईल, सीबीआयने केस अजुन बंद केलेली नाही असंही राणे यांनी सांगितलं.

थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? भाजपची जहरी टीका

वाघ हा घरात बसत नसतो तर तो मैदानात असतो. शिवसेनेत असताना आम्ही अंगावर केसेस घेतल्या यांनी काय केलं ते सांगावं असंही राणे म्हणाले. संजय राऊत म्हणजे शिवसेनेतले विदुषक आहेत अशी टीकाही राणे यांनी केली.

आशिष शेलार काय म्हणाले?

शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे OTTचा महा फ्लॉप शो होता. सर्व भाषण म्हणजे जळफळाट होता असा पलटवार भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? अशी जहरी टीकाही त्यांनी केली. विजयादशमीच्या दिवशी कुणाला वाईट बोलू नये म्हणून काल प्रतिक्रिया दिली नाही असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

'खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये'

शेलार म्हणाले, कंगनाने वाट लावली त्याचं प्रतिबिंब भाषणात दिसते आहे. भाजपच्या ताकदीचं दडपण उद्धव ठाकरे यांच्यावर दिसत होतं. सरसंघचालकांच्या भाषणाचा ठाकरेंनी विपर्यास केला आहे. संघाचं हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व याची तुलना करू नका. संघाचं हिंदुत्व ही त्वचा आहे, तर शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी पांघरलेली शाल आहे. ती शाल कधीही बाजूला करता येते.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 26, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading