अकोला, 13 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका पत्नीने आपल्याला नवऱ्याच्या प्रेयसीला रस्त्यावर गाठून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अकोल्यामध्ये (akola) दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका पत्नीने (wife) भररस्त्यावर पतीवर (husbend) हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील उमरी भागातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली. भर रस्त्यावरच नवरा बायकोचे भांडण पाहण्यास मिळाले. पती दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नीकडे दारूसाठी पैसे मागायचा. जर पैसे दिले नाहीतर तो तिला मारहाण करायचा.
या त्रासाला वैतागून पत्नीने घरातील कात्री हातात घेतली आणि नवऱ्यावर हल्ला केला. पत्नीचे रौद्ररुप पाहून नवऱ्याने पळ काढला. पण, रस्त्यावर तिने त्याला गाठलंच. त्यानंतर रस्त्यावर दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मध्यस्थी करून पतीची सुटका केली.
हे दाम्पत्य याच भागात राहणारे असल्याची माहिती कळाली. लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर नवरा बायकोचे भांडण सुटले. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये एका पत्नीने आपल्या पतीसोबत प्रेयसीला पाहून चांगलीच संतापली आणि मग तिने धावत जात प्रेयसीला आपल्याच स्टाईलमध्ये धडा शिकवला. हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याचं बोललं जात आहे.
NBA होतंय NBDA, वृत्तसंस्थांच्या संघटनेत आता डिजिटल माध्यमांचाही समावेश
पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवली होती. पाळत ठेवून पत्नीने पतीचा पाठलाग केला त्यानंतर पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमध्ये जाण्यासाठी थांबातच त्यांना रोखले. त्यानंतर पतीच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Wife