Home /News /national /

NBA होतंय NBDA, वृत्तसंस्थांच्या सर्वात मोठ्या संघटनेत आता डिजिटल माध्यमांचाही समावेश

NBA होतंय NBDA, वृत्तसंस्थांच्या सर्वात मोठ्या संघटनेत आता डिजिटल माध्यमांचाही समावेश

भारतातील वृत्तसंस्थांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA) आता डिजिटल स्वरुपात (Digital News Media) बातम्या देणाऱ्या संस्थांनाही संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट : भारतातील वृत्तसंस्थांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA) आता डिजिटल स्वरुपात (Digital News Media) बातम्या देणाऱ्या संस्थांनाही संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या News Broadcasts Association या नावाचा विस्तार करून ते News Broadcasts and Digital Association असं केलं आहे. त्यामुळे या संघटनेची व्याप्तीदेखील वाढली असून डिजिटल माध्यमांचाही या संघटनेत प्रवेश झाला आहे. डिजिटल माध्यमांचा विस्तार NBA ही टेलिव्हिजन माध्यमातील सर्वात मोठी संघटना असून देशातील सुमारे 80 टक्के माध्यमसंस्था याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत नवं तंत्रज्ञान विकसित होत असून डिजिटल मीडियाचा वेगाने विस्तार होत असल्याचं चित्र आहे. बातमीदारीच्या या नव्या व्यासपीठावर अनेक प्रस्थापित वृत्तसंस्था सध्या सेवा देत असून अनेक नव्या वृत्तसंस्थांचाही चंचूप्रवेश होत आहे. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणारं आणि वाचकाला सोयीचं ठरणारं माध्यम म्हणून डिजिटल माध्यमाकडं पाहिलं जातं. संघटनेत समावेश NBA चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल मीडियाला संघटनेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय झाला असून लवकरच नामकरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता डिजिटल माध्यमांच्या व्यवसायाशी आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न या संघटनेमार्फत मांडले जाणार आहेत. माध्यमांचा मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी अबाधित ठेवण्यासाठी या संघटनेचं काम महत्त्वपूर्ण मानलं जातं. हे वाचा -धोका वाढला! राज्यात डेल्टा + प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर इतर नावांतही बदल एनबीएकडून स्थापन करण्यात आलेल्या NBSA अर्थात न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथोरिटी या स्वायत्त संस्थेचं नावही बदलण्यात येणार असून ते आता NBDSA म्हणजेच न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड ऑथोरिटी असं करण्यात येणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Digital services, Television

    पुढील बातम्या