जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath shinde: उद्धव ठाकरेंबरोबर बिनसण्याचं कारण ठरला 'धर्मवीर'? राज ठाकरे यांच्याविषयीचा सीन ठरतोय चर्चेचा

Eknath shinde: उद्धव ठाकरेंबरोबर बिनसण्याचं कारण ठरला 'धर्मवीर'? राज ठाकरे यांच्याविषयीचा सीन ठरतोय चर्चेचा

Eknath shinde: उद्धव ठाकरेंबरोबर बिनसण्याचं कारण ठरला 'धर्मवीर'? राज ठाकरे यांच्याविषयीचा सीन ठरतोय चर्चेचा

एकनाथ शिंदे (eknath shinde)यांचे गुरू धर्मवीर आनंद दिघे (dharmveer anand dighe) यांच्या जीवनावर मागच्या काही दिवसांपूर्वी चित्रपट आला होता. त्याची चर्चा या बंडाच्या पार्श्वभूमीवर का होतेय?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विधानपरिषद निवडणुकीनंतर (mlc election) आपली नाराजी व्यक्त करत थेट सुरत (Gujarat surat) गाठले. दरम्यान शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या मोठ्या राजकीय बंडामुळे शिवसेनेला (shiv sena) मोठा भुकंप समजला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे (eknath shinde)यांचे गुरू धर्मवीर आनंद दिघे  (dharmveer anand dighe) यांच्या जीवनावर मागच्या काही दिवसांपूर्वी चित्रपट आला आहे. या चित्रपटामध्ये एक क्षण होता त्यावरून उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आजच्या नाराजीवर धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट (dharmveer anand dighe movie) कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे निष्ठावंत नेते आनंद दिघे (Shiv Sena leader late Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर (Dharmaveer marathi movie) हा चित्रपट आला होता. या चित्रपटात एकनाथ शिंदे तरूण वयातील काही क्षण घेण्यात आले आहेत. याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमीका महत्वाची दाखवली गेली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शेवटी एका सीनमुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे दिसून आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आणि आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा सध्या होत आहेत.

हे ही वाचा :  Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट

या सीनमुळे झाला होता वाद?

या चित्रपटाच्या एका प्रसंगात आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर ते रुग्णालयात होते. त्यांना भेटायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS leader Raj Thackeray) जातात. यावेळी आनंद दिघे हे राज ठाकरेंचा हात हातात घेऊन म्हणतात की, हिंदुत्व आता तुमच्या हातात सुरक्षित आहे. हा चित्रपट पाहतानाही हा सीन उद्धव ठाकरेंना आवडला नव्हता. त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हायच्या आधीच उद्धव ठाकरे उठून निघून गेले होते असे बोलले होते. यानंतर या चित्रपटातला हा प्रसंग वगळण्याची मागणी करण्यात येत होती. एकनाथ शिंदेंनाही याबद्दलची माहिती देण्यात आली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये धूसफुस असल्याच्या चर्चा आहेत. परंतु  यावर नेमका हा वाद आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत झालेली आघाडी यावर ते नाराज होते का? हे येणारा काळच ठरवेल अशी चर्चा आहे.

हे ही वाचा :  ‘समजने वाले को इशारा काफी है’; भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

एकनाथ शिंदे यांचे सूचक ट्वीट विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे रात्रीत गुजरातेत गेले आणि बंडाच्या बातमीनंतर त्यांनी पहिलंच ट्वीट केलं तेही सूचक होतं. त्यामध्ये आनंद दिघेंचा उल्लेख होता.

जाहिरात

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही  असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात